Homeक्राईमयाला मारहाण करून 307 दाखल होईल त्या पेक्षा याला घाटा खाली टाकू...

याला मारहाण करून 307 दाखल होईल त्या पेक्षा याला घाटा खाली टाकू असे म्हणत तरुणाचे केले अपहरण घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल, नगर शहरातील घटना पोलिसांचा धाक कमी होतोय का?

advertisement

अहमदनगर दि.२५ जानेवारी

अहमदनगर शहरातील गजराज नगर भागात एका तरुणाने अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली असून या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या व्हिडिओत तरुणाला अपहरण करण्यापूर्वी याला मारहाण करण्यापेक्षा घाटाखाली ढकलून देऊ मारहाण केल्याने खून करण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे त्याला मारून टाकू अशी धमकी देत मारहाण करत दुचाकीवर बळजबरीने बसून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ👇

या प्रकरणातील हकीगत अशी की सोहेल गनी सय्यद हा त्याच्या मावशीचे त्यांच्या शेजारील व्यक्तींशी जागेच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. ते वाद मिटविण्यासाठी सोहेल गजराज नगर येथे गेला होता. याचा राग मनात धरून आरोपी हफीज अन्सारी, बारव्या हफीज अन्सारी, बड्या हफीज अन्सारी व हफीज अन्सारीया चौघांनी गजराज नगर चौकाजवळील बेकरी जवळ सोहेल यास अडविले व त्यास लोखंडी रॉडने लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली.तसेच याला मारहाण करून उपयोग नाही हा जास्त शहाणा झाला आहे मारहाण करून खुनाचा प्रयत्न गुन्हा दाखल होऊ शकतो त्या पेक्षा त्याला घाटा खाली टाकू असे म्हणत आरोपींनी सोहेल यास बळजबरीने दुचाकीवर बसऊन अपहरण करून नेले होते.

मात्र प्रचंड मारहाणी मुळे सोहेल बेशुद्ध झाला होता जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं त्याच्या लक्षात आलं त्याने दिलेल्याजबाबावरून ४ आरोपींविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात भा.दं.वि.क. ३०७, १४३, १४४,१४७, ०४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल करून यामध्ये आणखी काही आरोपींचा समावेश असल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी सोहेलच्या नातेवाइकांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular