अहमदनगर दि.३१ मार्च
अहमदनगर शहरातील टीव्ही सेंटर या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत अढळलेल्या राजु घनाजी नेटके, वय
४५ वर्ष यांचे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले असून राजु घनाजी नेटके यांचे कोणी नातेवाईक ,मित्र, किंवा त्यांना ओळखणारे कोणी असतील तर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्याशी अथवा जावेद शेख मो. 88 57 88 22 55 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन तोफखाना पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
२५ मार्च रोजी राजु घनाजी नेटके, वय ४५ वर्ष ,हल्ली रा- हा टीव्ही सेंटर हे बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने १०८ अॅम्बुलन्स ने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
राजु घनाजी नेटके यांचे निधन झाले असल्याने त्यांना ओळखणाऱ्या नातेवाईक मित्र इतर नागरिकांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क साधावा