Homeराजकारणये तो बस झाकी है ... विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे...

ये तो बस झाकी है … विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे दुसरा मोठा बॉम्ब आहे तो दोन दिवसात फुटेल – चंद्रकांत पाटील

advertisement

मुंबई दि १३ मार्च

केंद्रीय तपास यंत्रणेकडून आम्हाला त्रास देत आहे का मग आम्ही तुम्हाला त्रास देतो असे म्हणून जे चालू आहे त्याच्यातला एक व्हिडिओ बॉम्ब माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी फोडला आहे आता दुसरा व्हिडीओ बॉम्ब उद्या परवा येत आहे त्यामुळे एका व्हिडिओ बॉम्बने इतकी चिडीचूप झाली आहे तर दुसरा व्हिडिओ बॉम्ब पडल्यावर काय होईल त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा आम्हाला घाबरवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही आशा नोटीस आल्यामुळे घाबरणारे नाहीत असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.

विरोधी पक्ष नेत्याला तुमचा माहितीचा सोर्स काय हे कायद्या प्रमाणे विचारता येत नाही लोकशाही मध्ये सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची निर्मिती झाली आणि घटनेप्रमाणे विरोधी पक्ष नेत्याला माहिती कुठून मिळते याचा विचारण्याचा अधिकार कोणालाही नाही नाही तर विरोधी पक्ष नेता सत्ताधाऱ्यांवर अंकुश कसा ठेवू शकेल असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

सरकारने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांना नोटीस देऊन फार मोठी चूक केली असून देवेंद्र फडवणीस हे एकटे नसून त्यांच्यामागे संपूर्ण भाजप आणि महाराष्ट्रातील जनता आहे आता हे प्रकरण सीबीआयकडे गेल्यानंतर सर्वकाही सत्य समोर येईल त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular