अहमदनगर दि २५ फेब्रुवारी
अहमदनगर शहराच्या जवळच असणाऱ्या श्री क्षेत्र बुऱ्हाणनगर येथे श्री जगदंबा तुळजाभवानीचे ऐतिहासिक मंदिर आहे.
या मंदिराच्या अवतीभवती मोठ्या दीपमाळा असून नवरात्रीच्या काळात नऊ दिवस या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते यावेळी या दीपमाळा प्रज्वलित असतात.
या ठिकाणी आलेले भाविक या दिपमाळेत तेल टाकण्यासाठी दीपमाळे वर चढतात मात्र आता या दीपमाळा हळूहळू जीर्ण होत असल्याने तुळजाभवानी मंदिरात येणारे भाविक आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार या दिपमाळेची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याचे काम मंदिराच्या पुजाऱ्यांनी सुरू केले होते मात्र गावातील काही राजकारणी आणि गुंडांनी या दीपमाळा दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्यास विरोध केल्याने अनेक दिवसांपासून हे काम ठप्प झाले आहे.
या ठिकाणी सुशोभीकरणासाठी काही साहित्यही येऊन पडले आहे मात्र राजकारणापायी या दीपमाळाचे काम सध्या बंद अवस्थेत असून देवाच्या दारात राजकारण न करता नागरिकांच्या भावनांशी खेळू नये अशी चर्चा आता बुऱ्हाणनगर मध्ये होऊ लागली आहे.