अहमदनगर दि.१८ मार्च – (सुशील थोरात)
,ताबा‘ या विषयावर पहिला लेख लिहिल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत वास्तवजन्य पुरावे देण्यासाठी काही लोक आता पुढे येत आहेत. मात्र बातमी करण्यापेक्षा ताबा मारणाऱ्या अशा गुंडांच्या टोळ्यांवर पोलीस कारवाई होणे ही काळाची गरज आहे अन्यथा पुढील काळात या टोळ्या सोकावतील आणि याचा त्रास पुढच्या पिढीला होऊ शकतो त्यामुळे कोणालाही न घाबरता कायदेशीर कारवाई करा हेच आवाहन आम्ही आज या लेखाद्वारे करत आहोत.
ताबा मिळणाऱ्या टोळ्या या कशा प्रकारे मोठ्या होतात याचं वास्तव फार भयंकर आहे काही टोळ्या या ताब्या प्रकारामुळे इतक्या गब्बर झाले आहेत की त्यांचा इतिहास पाहिला तर एक वेळ खाण्याची भ्रमंती असणाऱ्या तरुणांकडे काही वर्षात आलिशान चारचाकी गाड्या आणि गळ्यात चकाकणाऱ्या चैन ,महागडे फोन कमरेला हत्यार आले कोठून तर या ताबा प्रकरातून साम दाम दंड भेद वापरून कसे करून कमी श्रमात पैसे कमावणे हेच उद्दिष्ट ठेवल्याने या टोळ्या वाढत चालल्या आहेत.
सामन्य माणूस जीवनात काबाडकष्ट करून पै पै करून जमवलेल्या पैशातून मुलांसाठी कुठेतरी मोकळी जागा किंवा छोटं घर घेतो मात्र मुलं मोठी होतात बाहेर गावी शिकायला जातात मात्र हीच गोष्ट हेरून त्या सामान्य माणसाच्या घरावर अथवा जमिनीवर या टोळ्या कब्जा करतात हा कब्जा काढण्यासाठी तेव्हा सामान्य माणूस पोलीस ठाण्यापर्यंत जातो तेव्हा हा वाद जमिनीचा असल्यामुळे तुम्ही कोर्टात जाऊ शकता हे उत्तर मिळते तेव्हा या टोळीतील काही लोक मालकाशी संपर्क करून तडजोड करतात किंवा एखादा राजकीय नेता प्रकरण मिटवायला येतोच आणि तडजोड होऊन त्या मालकालाच आपल्याच जागेची किंमत ताबा सोडवण्यासाठी मोजावी लागते ही वस्तुस्थिती नगर शहरात सध्या आहे.
दोन भावांचे भांडणाचा फायदा घेऊन ताबा मारणे,बॉण्ड पेपर वर पैसे देऊन ताबा मारणे, आधी एखाद्या मालकाकडे जाऊन रीतसर सौदा करणे अर्धी रक्कम त्याला देणे तसा करार करून घेणे आणि त्यानंतर उरलेली रक्कम न देता परस्पर ताबा मारणे आणि पुढची रक्कम न देता उलट त्याच मालकाकडून ताबा सोडण्यासाठी दुप्पट रक्कम मागून घेणे हा एक प्रकार तर तुमच्याकडे जागा स्वमालकीची असल्याचे कितीही पुरावे असले तरी मसल बळावर ही जागा विक्री करु न देणे जागा खरेदी करण्यास कोणी आले तर जागेचा वाद आहे विकत घेऊ नका असा संदेश पसरवून अखेर कंटाळून त्या मालकाने ती जागा आपल्यालाच विकण्यास भाग पाडणे असे प्रकार वाढत चालले आहे .
कमी श्रमात कमी वेळात लाखो रुपये या ताब्या मधून मिळत असल्याने या गुंडांच्या टोळ्या आता राजकीय वर्तुळातही घुसू पाहत आहे त्यामुळे सर्वसामान्य राजकीय लोकांना याचा त्रास होतोय ही वास्तव परिस्थिती आहे. कारण फुकटच्या पैशातून तरुणांचं टोळकं मागे फिरवत राजकारणात प्रवेश करण्याच्या या ताबेमारू गुंडांच्या टोळ्यांमुळे जे राजकीय नेते जनतेतून सर्वसामान्य लोकांची समाज सेवा करून राजकीय नेता झालेले आहेत त्या लोकांना या गुंडांमुळें चांगलाच त्रास होतोय कारण चांगल्या राजकीय लोकांकडे बघण्याची दृष्टी सर्वसामान्य लोकांची बदलत चालली आहे.
चार दोन पिळदार शरीरयष्टी असलेले तरुण घ्यायचे एक आलिशान गाडी घ्यायची काही राजकीय लोकांचे फोटो चिन्ह गाडीवर लावायचे आणि दिवसभर आपल्या टोळक्या कडून कुठे कसा ताबा मारता येईल ताबा मारल्या नंतर कोण कोण माध्यस्थीला येईल समोरच्या माणसाची ताकत कुठवर जाण्याची आहे पोलीस आल्यावर कोणाला मध्यस्थी घालायचे आणि मग कशा प्रकारे पैसे भेटतील याची प्लॅनिंग करायची आणि ताबा मारायचा असा ताबा मारणाऱ्या टोळीचा दिनक्रम असतो .
बर आता या टोळ्यांचे प्रमुख राजकीय पदाधिकारी झालेत त्यामुळे यांचा पॉवर वाढला आहे.अडलेले नाडलेले सर्वसामान्य लोक यांना हेरून त्यांना अडचणीत टाकून मग आपणच त्यांचे कैवारी असल्याचं भासवत ताबा मारण्याचे प्रकार सावेडी उपनगरात सर्रास सुरू आहेत भाई,दाद,साईराम,मेम्बर अण्णा,चाचा,भाऊ,आशा टोपण नावांचे अनेक ताबा गुंड सध्या जोशात आहेत.दिसला मोकळा प्लॉट की मार कंपाउंड किंवा छोटीशी टपरी हाच यांचा उद्योग.
गेल्या काही वर्षात जमिनीचे भाव गगनाला भिडले असल्याने आता अनेक टोळ्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळे आता या टोळ्या टोळ्यांमध्ये सुद्धा ताबा मारण्यावरून सुप्त संघर्ष सुरू असतो मात्र एके दिवशी हा संघर्ष उफाळून येणार असून या संघर्षात काहीही होऊ शकते एखाद्याचा खून होऊ शकतो इतका पराकोटीचा संघर्ष सध्या ताबा प्रकरणावरून सुरू आहे.
वाचत राहा ताबा नगर शहराला लागलेली कीड पुढच्या भागात ताबा मारणाऱ्यांना तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी कसा शिकवला धडा….