अहमदनगर दि.२७ जानेवारी
अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे रोजच शेकडो नागरीक आपल्या समस्या घेऊन भेटीसाठी येत असतात.
सकाळी सात वाजल्यापासून त्यांच्या या भेटीगाठी च्या सत्र सुरू असते तर रात्री उशिरापर्यंत त्यांचा हा कामाचा झंझावात सुरू असतो. नागरिकांचे प्रश्न सोडवण्या बरोबर शहरातील कामे असतील काही कार्यक्रम असतील या सर्वांना आमदार संग्राम जगताप हजेरी लावणारच हा त्यांचा रोजचा दिनक्रम झालेला आहे.
मात्र त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यांचे लक्ष आलेल्या नागरिकांच्या प्रश्नांवर तर असतेच मात्र त्यांच्यासोबत आलेल्या लहान मुलांवर किती बारीक लक्ष असते ते या व्हिडीओ मधून समोर आले आहे.
एक कुटुंब आमदार संग्राम जगताप यांच्याकडे आपली एक समस्या घेऊन आले होते त्यांच्या बरोबर एक लहान मुलगी होती मात्र ती मुलगी अनवाणी पायांनी आल्याचं आमदार संग्राम जगताप यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या मुलीच्या पालकांशी संवाद साधत असताना तेवढ्या काळात त्यांनी त्या मुलीसाठी चप्पल खरेदी करून आणण्यास सांगितले.
त्या कुटुंबियांशी संवाद संपल्यानंतर जेव्हा ते कुटुंब निघाले असताना आमदार संग्राम जगताप यांनी त्या मुलीला जवळ बोलवत तिच्या पायात नवीकोरी चप्पल घालायला दिली आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदची लकेर उमटली
पहा व्हिडीओ
https://youtube.com/shorts/-hgnUhZs_tI?feature=share
हा व्हिडीओ पाहून आमदार संग्राम जगताप यांच्या कामाची प्रचिती नक्कीच आपल्याला समजून येते