सातारा –
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावर शशिकांत शिंदे समर्थकांनी दगडफेक केली असून पोलिसांनी या ठिकाणी आता बंदोबस्त वाढवला आहे. राष्ट्रवादीच्या ज्ञानदेव रांजणे यांच्याकडून शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव झाला त्यामुळे कार्यकर्त्यांनी संतप्त होत राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली. आहे. निवडणूक लागल्यापासून राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी शशिकांत शिंदे यांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे असा आरोप शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी केला आहे. तर दगडफेकीचे समर्थन आपण करणार नाही कार्यकर्त्यांची भावना असेल पण त्यांनी या प्रकारे आपल्या भावना व्यक्त न करता संयम पाळावा निवडणुकीत जय-पराजय होत असतो याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आपली निष्ठा शरद पवार यांच्यावर असल्याने आपण याबाबत काही बोलणार नाही असे स्पष्टीकरण शशिकांत शिंदे यांनी दिले आहे.
पक्षाने माझ्यावर अतोनात प्रेम केला आहे पक्षाने दिलेली जबाबदारी मी समर्थपणे पेलत आहेत मात्र काही कार्यकर्त्यांनी जर हे कृत्य केले असेल तर त्याचे मी समर्थन करणार नाही निवडणुकीत जय-पराजय होत असतो त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम पाळावा- शशिकांत शिंदे