Homeजिल्हाराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने महानगरपालिकेमध्ये नियोजन बैठक संपन्न, ...

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने महानगरपालिकेमध्ये नियोजन बैठक संपन्न, आपल्या ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस दयावा महापौर रोहिणी शेंडगे यांचे आवाहन

advertisement

अहमदनगर दि.२१ -फेब्रुवारी
अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती
सभागृहामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२२ च्या अनुषंगाने महापौर रोहिणी शेंडगे यांचे अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न झाली.पोलिओ आजाराचे निर्मुलन करण्यासाठी सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांसाठी राबविण्यात येत आहे.

ही मोहिम दि.२७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी अयोजित करण्यात आली आहे. या मोहिमध्ये (bovp) बायव्हायलंट या लसीचा वापर करण्यात येणार आहे. मोहीम १०० टक्के यशस्वी होण्याकरिता शहरामध्ये पोलिओ रविवार (पीपीआय) बुथ व त्यानंतर ५ दिवस याप्रमाणे घर भेटीचे (आयपीपीआयचे) नियोजन करण्यात येते. तसेच ट्रांझिट, मोबाईल व नाईट टीमचेही आयोजन करण्यात येते.

कोविड पार्श्वभूमीवर सर्वसाधारणपणे १०० ते १२० लाभार्थ्यांमागे १ बुथ याप्रमाणे नियोजन करण्यात येते. प्रत्येक बुथवर २ कर्मचारी नेमून त्यांना त्या दिवशीच ९० टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले जाते. ५ बुथमागे १ पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, टोलनामा, मंदिर, मस्जिद, यात्रा किंवा गर्दीच्या ठिकाणी ट्रान्झिट बुथचे आयोजन केले जाते.
बांधकामाच्या ठिकाणी, विटभट्टया, मंदिरे, बगिचे, फुटपाथवरील लाभार्थी, तात्पुरत्या वसाहती, झोपडया/पाले, प्रसुतीगृहे, खाजगी दवाखाने या ठिकाणी मोबाईल टिमचे आयोजन करुन लसीकरण केले जाते. फुटपाथवर रहाणा-यांकरिता नाईट टिमचे आयोजन केले जाते.

तसेच महात्मा फुले आरोग्य केंद्र – जिजामाता आरोग्य केंद्र , तोफखाना आरोग्य केंद्र , सिव्हील आरोग्य केंद्र, केडगाव आरोग्य केंद्र , नागापूर आरोग्य केंद्र ,मुकुंदनगर आरोग्य केंद्र व कॅन्टोन्मेंट हॉस्पीटल – याप्रमाणे पोलिओ बुथचे नियोजन असून एकूण ९०५ कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. मनपा स्तरीय अधिकार- ५, वैदयकीय अधिकारी – ८ व सुपरवायझर – ४४ नेमण्यात आलेले आहेत. सर्व आरोग्य केंद्र मिळून एकूण ४५४७३ उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

याबाबत दि २२व २३ फेब्रुवारी रोजी व्हॅक्सीनेटर
प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. बाळ आजारी असले तरीही, नुकतेच जन्मलेले असले
तरीही व यापूर्वी पोलिओचा डोस दिला असला तरीही सदर दिवशी ५ वर्षाच्या आतील बाळाला पोलिओचा डोस देण्यात यावा. तरी सर्व नागरिकांनी आपल्या ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस दयावा,
असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे, उपमहापौर गणेश पुंडलिक भोसले,स्थायी समिती सभापती कुमार वाकळे,सभागृह नेता अशोक किसन बडे, विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, महिला व बालकल्याण समिती सभापती बोरुडे पुष्पा अनिल, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे,उपायुक्त श्रीनिवास कुरे.यशवंत डांगे यांनी केले आहे. यावेळी मा.महिला व बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे आरोग्य अधिकारी डॉ.सतिष राजुरकर, प्र.प्रसिध्दी अधिकारी शशिकांत नजान, वैदयकीय अधिकारी आयेशा शेख, नलिनी थोरात, गिरीष दळवी, कविता माने, भारती डापसे, आशना सय्यद, शिल्पा चेलवा, गितांजली पवार, समन्वयक यांची उपस्थिती होती

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular