Homeक्राईमराहुरी पोलीस स्टेशनला 'या' दबंग अधिकाऱ्याची नियुक्ती

राहुरी पोलीस स्टेशनला ‘या’ दबंग अधिकाऱ्याची नियुक्ती

advertisement

राहुरी दि. १९ जानेवारी
राहुरी पोलीस ठाण्यात गेल्या दीड वर्षांपासून कोणत्याही पोलीस निरीक्षकला सहा महिन्यांन पेक्षा जास्त कारकिर्दी पूर्ण करता आली नाही.

नुकतेच राहुरी पोलीस स्टेशन मधून कुविख्यात सागर भांड टोळीने कारागृहाचे गज कापून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता या घटने नंतर राहुरी पोलीस ठाण्यातील उपनिरिक्षकासह सहा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते तर काही दिवस नंतर राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांचे निलांबन करण्यात आले होते. तेव्हा पासून राहुरी पोलीस ठाण्याचा कारभार पोलीस निरीक्षकाविना चालू होता.

नाशिक येथून नव्याने नगर येथे बदली होऊन आलेले प्रताप दराडे बुधवारी नगर येथे हजर झाले असता त्यांना राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी असे आदेश काढले असून लवकरच प्रताप दराडे पदभार स्वीकारणार आहेत.नाशिक येथे तांत्रिक विश्लेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती येथील मूळचे रहिवासी असलेले दराडे यांनी यापूर्वी मुंबई,पालघर, मनोर व स्थानिक गुन्हे अन्वेशाखा भोईसर येथे स.पो.नि. म्हणून तर नाशिक येथे तांत्रिक विश्लेषक शाखेच्या वरीष्ठ निरीक्षकपदी काम पाहिले आहे.अत्यंत शिस्तप्रिय व खमक्या आधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular