अहमदनगर दि.३१ जानेवारी
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (अंबेडकर) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे हे बुधवारी नगर जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत आंबेडकर भवन येथे साडेतीन वाजता नगर शहरातील युवकांचा पक्ष प्रवेश होणार आहे. सायंकाळी अरणगाव येथे पक्ष कार्यलयाचा शुभारंभ आणि काही शाखांचा शुभारंभ दीपक निकाळजे यांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती रोहित आव्हाड, जितु पाटोळे,हरीश आल्हाट,संदिप वाघमारे यांनी दिली आहे.
तसेच नगर शहर ते अरणगाव पर्यंत दुचाकीवर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून निवडणुकीबाबत सर्वांची भूमिका दिपक निकाळजे जाणून घेणार आहेत.
असा असेल त्यांचा नगर शहरातील कार्यक्रम-
बुधवार दि. २/२/२०१२ रोजी दु. ३.३० वा.
आंबेडकर स्मारक, टिळकरोड,
स्वागत व युवकांचा पक्ष प्रवेश मेळावा
सायं.५.३० वा.
पॅराडाईज हॉटेल, टिळकरोड,
पत्रकार परिषद
आंबेडकर स्मारक, टिळकरोड ते अरणगाव बाईक रॅली
सायं.६.०० वा.पक्ष कार्यालय शाखा उद्घाटन अरणगाव