पाथर्डी दि ५ एप्रिल
पाथर्डी शहरातील शेवगाव रोड लगत लड्डा गॅरेज च्या पाठीमागे मोकळ्या जागेत तिरट नावाची हारजीत खेळ खेळत आहे. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी स्वतः व त्यांच्या सहकार्य समवेत हा छापा टाकून तीरट नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडे चार हजार दोनशे सत्तर रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
या पोलिसांच्या छाप्यात संजय रघुनाथ दिनकर वय ५०वर्षे, रा. नाथनगर,सुभाष जगन्नाथ दिनकर, वय ५१ वर्षे, रा. नाथनगर , मुनीर गुलाबभाई शेख वय ५५ वर्षे, रा.इंदिरानगर, सुनिल काशिनाथ दिनकर, वय ३५ वर्षे, रा. कसबापेठ, बाबा विनायक दिनकर, वय ३० वर्षे, रा. कसबापेठ, सर्व रा.ता.पाथर्डी या पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.