अहिल्यानगर दिनांक ११ जून
सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुवारी १२ जून रोजी
भव्य जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पाथर्डी शहरात गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहाद, गोरक्षकांवरील प्राणघातक हल्ले, खुलेआम गोमांस विक्री आणि अवैध कत्तलखाने सुरू आहेत. या घटनांमुळे हिंदू समाजामध्ये असंतोष आणि संताप निर्माण झाला असून. हिंदूंच्या धार्मिक भावना आणि कायद्याचे खुलेआम उल्लंघन करणाऱ्या घटनांना पाथर्डी तालुक्यात आता विरोधाची ठाम भूमिका घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा धर्मविरोधी कारवायांच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी आहे.

या मेळाव्यास अदीनाथ महाराज शास्त्री ह. भ.प. श्री संग्राम बापू भंडारे, आमदार संग्रामभैय्या जगताप,
आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार गोपीचंदजी पडळकर,आमदार सौ मोनिकाताई राजळे, सागर भैय्या बेग यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.





