पाथर्डी दि.२० डिसेंबर
वंचित बहुजन आघाडी पाथर्डी तालुक्याच्या वतिने शासकीय विश्राम ग्रह येथे आगामी नगर पालीकेच्या निवडणुकीच्या पार्शभूमिवर विचार मंथन करऩ्या साठी व शहर पदाधिकारी याच्या निवडी करन्या साठी बैठक आयोजीत करन्यात आली होती या वेळी अध्यक्ष स्थानावरुन बोलताना प्रा.किसन चव्हाण म्हनाले की गेल्या चार पर्षापासुन महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडाची घोडदौड चालू आहे गेल्या महिन्यात झालेल्या जि.प.व पंचायत समितीच्या विजयात वंचितची भुमिका महत्वाची राहीली आहे. मागच्या विधान सभेच्या निवडणुकीत सुध्दा पस्तीस जागेवर वंचीतचे उमेद्वारांनी दोन नंबरवर स्थान पटकावुन प्रस्थापितांना हादरे देन्याचे काम केले आहे त्यामुळे सामान्य जनतेने वंचितला स्विकारले आहे आगामी येना-या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी पुर्ण ताकतीनिशी लढनार आहे कार्यकर्त्यानी जोमाने कामाला लागुन सत्ताधारी बनायचंय ही खुनगाठ मनाशी बांधायची असे प्रतिपादन चव्हाण यांनी केले
.पाथर्डी शहरातील नविन पधाधिका-याच्या निवडी करण्या आल्या शहर अध्यक्ष म्हनुन सनी दिनकर,तर उपाध्यक्ष म्हनुन किशोर फतपुरे व अंबादास पालवे यांची निवड जाहीर करूण त्यांचा सत्कार प्रा.किसन चव्हाण याचे हस्ते करण्या आला
या वेळी प्रास्तविक जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के,तर शेख प्यारेलाल भाई,रविद्र उर्फ भोरू म्हस्के,सोपान भिंगारे,शैलेद्र बोदर्डे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले या वेळी शहरातील युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेवटी महेश पवार यांनी आभार व्यक्त केले.