Homeविशेष'वर्क फ्रॉम होम', आता पोलीसही करू शकणार गृहविभागाचा मोठा निर्णय

‘वर्क फ्रॉम होम’, आता पोलीसही करू शकणार गृहविभागाचा मोठा निर्णय

advertisement

मुंबई दि.६ जानेवारी

महाराष्ट्रात कोरोना चा कहर सुरु असल्यामुळे धोका पत्करून पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत.त्यामुळे आता गृह विभागाने पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिसांनाही आता वर्क फ्रॉम होम लागू होणार आहे. पोलीस दलातील ५५ वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यबाबत माहिती दिली आहे.

कोरोनाच्या वाढता धोक्यामुळे पोलिसांनाही संकटाचा सामना करावा लागतोय. जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र पोलिसांना २४ तास रात्रंदिवस कामावर रुजू व्हावे लागत आहे. आतापर्यंत अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मुंबईतही गेल्या २४ तासांमध्ये ७१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने ५५ वर्षांवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा आदेश दिला आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular