HomeUncategorizedवाढदिवसाचा फलक लावण्यासाठी चढला आणि स्वतःच मृत्यूच्या दारात पोहचला ,महानगर पालिका आणि...

वाढदिवसाचा फलक लावण्यासाठी चढला आणि स्वतःच मृत्यूच्या दारात पोहचला ,महानगर पालिका आणि विद्युत वितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रोफेसर चौकात एका युवकाचा मृत्यू ती दिशादर्शक लोखंडी कमान ठरतेय मृत्यूचा सापळा

advertisement

अहमदनगर सुथो –

अहमदनगर महानगरपालिका आणि वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेला एका युवकाचा बळी. सावेडी उपनगरा मधील प्रोफेसर कॉलनी चौकात गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका युवकाचा लोखंडी कमानीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महानगर पालिकेने खाजगी ठेकेदारीतून शहरात विविध ठिकाणी मोठ्या लोखंडी कमानी उभारून दिशा दर्शक फलक तसेच विविध जाहिराती लावण्यासाठी परवानगी दिली आहे . मात्र या कामानी उभारताना सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच बाबींकडे दुर्लक्ष केल्याच दिसून येत आहे.प्रोफेसर चौकातील मोठ्या लोखंडी कामाने शेजारूनच विद्युत तारा गेल्याने या ठिकाणी अपघात होऊ शकतो अशी तक्रार कमान उभारण्याच्या आधीच येथील आसपासच्या व्यवसायिकांनी केली होती. या आधीसुद्धा या कामानिवर बोर्ड लावताना दोन मजुरांना शॉक लागून ते कमानी वरून खाली पडले होते. मात्र तरीही ही लोखंडी कमान उभा करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या दुर्लक्षामुळे आज एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

सौरभ चौरे असे या युवकाचे नाव असून आज पहाटेच्या सुमारास वाढदिवसाचे बॅनर लावण्यासाठी तो या लोखंडी कमानी वर चढला असताना कमानी जवळून गेलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्यामुळे तो झटका बसून खाली पडून जागेवरच मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. ठेकेदाराने केलेले दुर्लक्ष आणि महावितरणने केलेल्या दुर्लक्ष यामुळे एका युवकाचा नाहक बळी गेला

आहे. मात्र आता पुन्हा एकदा दोन्ही प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवून या मृत्यूस कारणीभूत कोण असा प्रश्न उपस्थित करतील प्रोफेसर चौकातील ती लोखंडी कमान काढून टाकावी अशी मागणी येथील व्यवसिकांनी केली आहे. कारण यामुळे व्यापाऱ्यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो त्यामुळे लवकरात लवकर ही कमान काढावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular