Homeविशेषवाहतुकीचे नियम मोडल्यास होऊ शकतो मोठा दंड,वाहतूक अधिनियमात सुधारणा झाल्याने आपली एक...

वाहतुकीचे नियम मोडल्यास होऊ शकतो मोठा दंड,वाहतूक अधिनियमात सुधारणा झाल्याने आपली एक चुकी करू शकते आपला खिसा रिकामा

advertisement

अहमदनगर –
वाहन चालकांनो सावधान आता वाहतूक नियम मोडल्यास खिसा होईल रिकामा करण आता महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन (सुधारित) अधिनियम २०१९ ची अंमलबजावणी करणेबाबत अधिसुचना काढलेली असुन या अधिसुचनेची अंमलबजावणी मुळे११डिसेंबर पासून वाहनांच्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. दंड टाळण्याकरता वाहनधारकांनी नियमात वाहन चालवावे अन्यथा मोठी दंडात्मक कारवाई होऊ शकते असे आवहान अहमदनगर शहर वाहतूक पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. तसेच काही नियमांमध्ये उल्लंघन केल्यास थेट न्यायालयात खटला दाखल होऊ शकतो. त्यामुळे वाहन चालवताना आपली सर्व कागदपत्रे जवळ ठेवत आणि नियम पाळूनच वाहन चालवावे असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र  भोसले यांनी केली आहे.
. ११/१२/२०२१ रोजी मध्यरात्रीपासुन खालीलप्रमाणे मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणारे वाहन धारक
यांचेकडुन करण्यात येणारी सुधारीत दंड आकारणी खालीलप्रमाणे.

१) लायसन्सशिवास वाहन चालविणे आधी
५०० दंड होता सुधारीत दंड ५०००

२) Lबोर्ड शिवाय वाहन चालविणे (शिकाऊ) २०० आधी
५०० दंड होता सुधारित१५००

३) विना हेल्मेट आधी
५०० दंड होता सुधारित ५०० पुन्हा केल्यास लायसन्स ०३ महिने अवैध

४) मोबाईलचा वापर आधी
२०० दंड होता सुधारित ५०० पुन्हा केल्यास १५००

५) सिट बेल्टचा वापर न करणे आधी
२०० दंड होता सुधारित ५०० पुन्हा केल्यास १५००

६) ट्रिपल सिट आधी
१००० दंड होता सुधारित लायसन्स ०३ महिने अवैध

७)राँग साईने वाहन चालविणे १००० .न्यायालयात खटला

८) कर्णकर्कश हॉर्न वाजविणे आधी २०० सुधारीत१००० पुन्हा केल्यास २०००

९) पोलीस ईशान्याचे पालन न करणे आधी २०० दंड होता सुधारित ५०० पुन्हा केल्यास १५००

१०) ब्लॅक फिल्म आधी २०० दंड होता सुधारित ५०० पुन्हा केल्यास १५००

११) मादक द्रव्याचे सेवन करुन वाहन चालविणे
न्यायालयात खटला

त्यामुळे वाहनचालकांनो आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना लक्षात ठेवा आपली एक चुकी आपला खिसा रिकामा करू शकते त्यामुळे वाहन चालवताना सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच वाहन चालवा

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular