Homeशहरव्यापारी फेरीवाले यांच्या मधील संघर्षाला जबाबदार कोण महापालिका की राजकारण

व्यापारी फेरीवाले यांच्या मधील संघर्षाला जबाबदार कोण महापालिका की राजकारण

advertisement

अहमदनगर दि १२ मार्च
दुकानासमोर कपडे विकण्याची हातगाडी लावन्यवरून शहरातील घसगल्ली येथे कापड दुकानदार आणि फ़ेरीवल्या मध्ये वाद झाल्याने याचे चांगलेच पडसाद उमटले होते .

केतन कुंतीलाल मुथा यांचे घास गल्ली येथे सो अॅण्ड सो नावाने कापड दुकान आहे शनिवारी सकाळी केतन मुथा नेहमी प्रमाणे आपले दुकान उघडून साफसफाई करत असतानाच दुकानासमोरील जागेवर इरफान कासम मेमन याने त्याची कपडे विकण्याची हातगाडी लावली त्यामुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना अडचण होईल त्यामुळे केतन मुथा यांनी ती गाडी काढण्याची विनंती केली मात्र ही विनंती धुडकावत इरफान याने केतन मुथा यांनाअरेरावीची भाषा सुरू केली त्यावेळी केतन मुथा यांच्या शेजारील दुकानदार संतोष मुनोत यांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही इरफान याने अरेरावीची भाषा केली.त्या नंतर इरफान मेमन याचे भाऊ मुसद्दीक मेमन, मोईस मेमन यांनी केतन गुप्ता आणि संतोष मुनोत यांना दमदाटी करून शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याने या घटनेचा निषेध करत कापड बाजार मधील व्यवसायिकांनी दुपारी दुकान बंद ठेवून गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली होती.

ही घटना कळताच कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी कापड बाजारात आपल्या फौजफाटा घेऊन धाव घेत वातावरण शांत केले.तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही घटना समजल्या नंतर त्यांनी कापड बाजारात येऊन घटनेचा निषेध केला.

तसेच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनीही कापड बाजारात धाव घेऊन व्यापाऱ्यांशी चर्चा करून दुकाने उघडण्या बाबत विनंती केली.

या घटनेबाबत कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये केतन मुथा यांच्या फिर्यादीवरून मेमन बंधन विरुद्ध मारहाण करणे शिवीगाळ करणे आणि धक्काबुक्की करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर सोमवारी कापड बाजार मधील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

अहमदनगर शहरातील आजपर्यंतचा इतिहास असा आहे की अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचे पथक गेले की त्या ठिकाणी राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते यांची फोन खणखणू लागतात आणि ही अतिक्रमण काढण्याची मोहिम बरगळुन जाते मतांचे राजकारण आणि संबंध टिकवण्यासाठी अनेक वेळा फक्त अतिक्रमण मोहीम ही देखाव्या पुरती राबवली जाते. अतिक्रमण पथक पुढे गेली ही काही वेळातच पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण उभा झाल्याचे चित्र आजपर्यंत नगरकरांनी पाहिले आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या कापड बाजारातील अतिक्रमण हटाव मोहीमही अशीच असेल अतिक्रमण पथक पुढे जाईल आणि त्यांच्या मागून पुन्हा अतिक्रमणे उभा राहतील.

एकीकडे महानगरपालिका कापड बाजार मधील रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून दहा ते वीस रुपये शुल्क आकारून पावती देत असते त्यामुळे अनेक वेळा व्यापारी आणि फेरीवाले मध्ये वाद होत असतात मात्र हे वाद उफाळून आल्याने आज मोठा संघर्ष पाहायला मिळाला.

कापड बाजारात मोठे अतिक्रमण झाल्यामुळे या ठिकाणी चालणेही मुश्कील होत असते मात्र याकडे महापालिका अतिक्रमण विभाग आपल्या सोयीनुसार लक्ष देत असल्याने अतिक्रमण धारकांची मजल वाढत असून कापड बाजारात रस्ता दिसणे ही मुश्कील झाले आहे.

अहमदनगरच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण याबाबत सातत्य राखले तर आणि अतिक्रमण मोहीम वेळी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन बंद ठेवले तर निश्चित नगरमधील अतिक्रमणे पाठवला वेळ लागणार नाही अशी चर्चा आता सूज्ञ नागरिक करू लागले आहेत

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular