अहमदनगर दि ७ मार्च
कोणत्याही व्यावसायिकाला व्यवसाय करायचा असेल तर आपले दुकान हे रोडच्या दिशेने बांधून रोडच्या दिशेने त्याचे दार असते मात्र अहमदनगर शहरातील एकविरा चौक हा उलट्या टपाऱ्यांसाठी प्रसिद्ध होतोय.
आठ मार्च अर्थातच जागतिक महिला दिन जगात सर्वच ठिकाणी हा सण साजरा होत असतो आज महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नाही अनेक महिला शिकून मोठ्या झाल्या आहेत तर याउलट काही महिला अजूनही काही गोष्टींमुळे मागे राहिल्या आहेत मात्र यातूनही जगण्याची धडपड ही चालूच असते या महिला दिनी अहमदनगर शहरातील उपनगरा मधील काही महिलांची आम्ही संवाद साधला असताना या महिलांनी एकच विनंती केली आहे की एकविरा चौकामधील असलेले अवैध धंदे बंद करा आणि आमच्या कुंकवाचा आणि आमच्या घराचे रक्षण करा अशी आर्त विनवणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
सावेडी उपनगरातील एकविरा चौक हा उच्चभ्रू वस्ती सह सर्वसामान्य कष्टकरी नागरीकांचा रहिवासी असलेला भाग झाला आहे. मात्र या चौकात अनेक अवैध धंदे असल्यामुळे सर्वसामान्य घरातील नागरिक दिवसभर कष्ट करून आलेला पैसा या ठिकाणी असलेल्या अवैध सुरू असलेल्या जुगार मध्ये घालत असल्याने घरी जाणार पैसे जुगारात गेल्याने घरातील लक्ष्मी नाराज होते आणि घराचा प्रपंच चालवायचा कसा हा प्रश्न घरातील लक्ष्मी समोर उभा राहतो.
जुगारात पैसे हरल्यानंतर घरी गेलेला तो माणूस सर्व राग मुलाबाळांवर काढतो त्यामुळे घरातील वातावरण नेहमीच टेन्शनमध्ये असते दिवसभर महिला आणि पुरुष दोघेही कष्ट करतात मात्र सर्व पैसा जुगार मध्ये पार्टी आणि पुन्हा सकाळी उठल्यापासून तेच कष्टाचे दिवस त्या महिलेला पाहावे लागतात.
विशेष म्हणजे एखाद्या व्यावसायिकाने दुकान टाकायचं ठरवलं तर त्याचे दुकानाचे दार हे रोडच्या दिशेने असते मात्र एकवीरा चौक ते सिटी प्राईड हॉटेल पर्यंत अनेक टपऱ्या आशा दिसतात की या टपाऱ्यांची दारे रोडच्या विरुद्ध दिशेने असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हा प्रश्न पडतो की हे दुकाने असे उलट्या दिशेने का आहेत मात्र या उलटया टपाऱ्यात अवैध धंदे जोरात चालू असून याठिकाणी लाखो रुपयांचा जुगार खेळला जातो हे जुगार बंद करा अशी आर्त विनवणी या ठिकाणी आसपास राहणाऱ्या सर्वसामान्य कष्टकरी महिलांनी केली आहे.
प्राईम केअर हॉस्पिटल समोरील लाईन मध्ये जर आपण पाहिलं तसेच एकवीरा चौकातील सिटी बस स्थानक त्याच्यामागे जे अवैध धंदे सुरू आहेत मात्र या ठिकाणी आज पर्यंत एकही छापा पडल्याचं याठिकाणी राहत असलेल्या नागरिकांनी पाहिलेले नाही.
लीप सुंगे आणि ईरा बत्ती च्या या धंद्यांना अभय कोणाचं हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे घरातील आर्थिक परिस्थिती तसेच त्यांचं जीवन सुधारण्यासाठी असे अवैध धंदे बंद करा हीच मागणी या परिसरातील महिलांनी केली आहे.