HomeUncategorizedशहराचा कचरा प्रश्न पुन्हा पेटणार,बुरुडगाव ग्रामपंचायतीने महापालिकेला दिलेला ना हरकत ठराव...

शहराचा कचरा प्रश्न पुन्हा पेटणार,बुरुडगाव ग्रामपंचायतीने महापालिकेला दिलेला ना हरकत ठराव केला रद्द

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी
बुरुडगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत महानगरपालिकेच्या सप्टेंबर 2020 मध्ये कचरा डेपो उभरण्यासाठी दिलेली नाहरकत रद्द करण्याचा ठराव मंजूर केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी मीना जाधव यांनी दिली आहे. ग्रामपंचायत सदस्य बंडू काळे ,बाळासाहेब जाधव ,जालिंदर वाघ ,दिनेश दरंदले, जालिंदर कुलट, अंबादास गायकवाड, रवींद्र ढमढेरे ,दिनेश शेळके, रोहिदास जाधव आदींनी या विषयावर मत व्यक्त करत महापालिकेने अटी व शर्तीचा भंग केल्याच्या निदर्शनास आणले. चार हजार लोकसंख्या असलेल्या बुरुडगाव गावाला मोफत पाणी पुरवठा करावा तसेच नगर ते बुरुडगाव पर्यंतचा रस्ता तयार करावा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करावे, सीना नदीवरील पूल उभा करावा, कचरा डेपोमध्ये टाकण्यात यावा तसेच बुरुडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील कचरा महानगरपालिकेने उचलावा, कचरा डेपोमुळे दुर्गंधी पसरत असेल त्यासाठी औषध फवारणी करावी अशा अटी व शर्ती लावून ग्रामपंचायतीने महानगरपालिकेला नाहरकत दिली होती मात्र या पैकी एकही अटींची पूर्तता महानगरपालिकेने न केल्याने सदस्यांनी त्यावर आक्षेप घेत महानगरपालिके बरोबरचा करा रद्द करावा अशी मागणी केली होती त्यावर ठरवून महानगरपालिकेने दिलेली नाहरकत रद्द करण्यात आले आहे याबाबतचे पत्र महानगरपालिकेला लवकरच मिळणार असून यानंतर कचरा संकलन चा मोठा प्रश्न महानगरपालिकेसमोर उभा राहणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा कचरा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular