Homeजिल्हाशहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत नागरीकांनी पाणी जपून वापरावे महापालिकेचे आवाहन

शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत नागरीकांनी पाणी जपून वापरावे महापालिकेचे आवाहन

advertisement

 

अहमदनगर दि.२१ –
गुरुवार दि.२०-०१-२०२२ रोजी सायंकाळी ५.४५ ते सायंकाळी ६.०० या वेळेत वीज वितरण कंपनीकडून शहर पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झालेला होता. वीज पुरवठा सुरु झाले नंतर बंद पडलेला पाणी उपसा सुरु करीत असताना विळद पंपींग स्टेशन येथील
महानगरपालिकेच्या सबस्टेशन मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झालेला असल्याचे निदर्शनास आले. तद्नंतर
सबस्टेशन मधील दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेउन युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येत असताना दरम्यान
म्हणजेच आज पहाटेच्या सुमारास तेथील २५०० के.व्ही.ए. चा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास
आले. सदर ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे कामही महानगरपालिकेने तातडीने हाती घेतलेले आहे. परंतू सदरचे काम विस्तृत स्वरुपाचे असल्याने आज दि.२१-०१-२०२२ रोजी सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे व तद्नंतरच बंद पडलेला पाणी उपसा टप्याटप्प्याने सुरु करण्यात येईल. वरील तांत्रिक अडचणी/ बिघाड निर्माण झाल्याने गुरुवार दि.२०-०१-२०२२ रोजी सायंकाळी ५.४५ पासून शुक्रवार दि.२१-०१-२०२२ रोजी सायंकाळपर्यंत मुळानगर येथून शहरासाठी होणारा पाणी उपसा सलग २४ तास बंद असल्याने दि.२०-०१-२०२२ रोजी सायंकाळी पाणी वाटप सुरु असलेल्या स्टेशनरोड भागास पाणीपुरवठा होउ शकलेला नाही. या भागास दि.२२-०१-२०२२ रोजी पाणीपुरवठा करणेत येईल.

तसेच आज शुक्रवार दि.२१-०१-२०२२ रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती
भागास म्हणजेच सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, ख्रिस्त
गल्ली, माळीवाडा, माणिकचौक, आनंदी बाजार, जुने म.न.पा. कार्यालय परिसर, पंचपीर चावडी,
बालिकाश्रम रोड परिसर, स्टेशन रोड, विनायकनगर, आगरकर मळा इत्यादी भागासह बोल्हेगाव, नागापूर,
सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर तसेच मुकुंदनगर, केडगाव, नगर-
कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास पाणीपुरवठा झालेला नसून तो शनिवार दिनांक
२२-०१-२०२२ रोजी करण्यात येईल.

शनिवार दि.२२-०१-२०२२ रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, कोठला, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय
परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड,
प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको, सावेडी, सारसनगर व
बुरूडगांव रोड या भागातील पाणीपुरवठा हा गुरूवार ऐवजी रविवार दि.२३-०१-२०२२ रोजी करण्यात येईल.

शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले आहे अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे व मा.आयुक्त श्री.शंकर गोरे यांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular