Homeजिल्हाशहरातील अवैद्य गोवंशीय कत्तलखान्यांचे अतिक्रमणे पोलिसांच्या मदतीने समूळ नष्ट करू मनपा आयुक्तांचे...

शहरातील अवैद्य गोवंशीय कत्तलखान्यांचे अतिक्रमणे पोलिसांच्या मदतीने समूळ नष्ट करू मनपा आयुक्तांचे हिंदू संघटनांच्या शिष्टमंडळाला आश्वासन

advertisement

अहमदनगर दि. ११ फेब्रुवारी
अहमदनगर शहरात आजही अनेक गोवंशीय जनावरांचे कत्तलखाने सुरू असून या बाबत आवाज महाराष्ट्रने बतमीद्वारे पोलीस आणि महापालिकेचे लक्ष वेधले होते मात्र आद्यपही कत्तलखाने राजरोस सुरू असून या कत्तलखाने सुरू ठेवण्यामागे कोणती अदभुत शक्ती काम करते ते अद्याप समजले नाही.

शहरातील काही भागात अजूनही बीफ विक्रीचे दुकाने राजरोस सुरू आहेत तर काही हॉटेल मध्ये सर्रास बीफ मटण विक्री सुरू आहे. गोवंश जनावरांच्या कत्तलीवर कायद्याने बंदी असताना मग हे बिग दुकान आणि हॉटेलमध्ये बीफ येतो कुठून हा मोठा प्रश्न समोर येतोय.

मात्र हे कत्तलखाने कायमचे बंद करण्यासाठीअहमदनगर शहरातील हिंदू संघटना सरसावल्या असून सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मोभारकर,दिपक वांढेकर यांच्या नेतृत्वाखाली विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनमनपा आयुक्त आयुक्त शंकर गोरे यांच्या कडे जाऊन बीफ हॉटेल आणि बीफ विकणारी दुकाने महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आले असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी या शिष्टमंडळाशी चर्चा करून लवकरच याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संयुक्त बैठक घेऊन ही अशी अतिक्रमणे आणि कत्तलखाने समूळ नष्ट करता येतील या बाबत नियोजन करून कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular