HomeUncategorizedशहरातील रस्त्यांच्या कामासाठी शहर काँग्रेस रस्त्यावर उतरत असताना मनपाच्या सत्तेत सहभागी असणाऱ्या...

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी शहर काँग्रेस रस्त्यावर उतरत असताना मनपाच्या सत्तेत सहभागी असणाऱ्या काँग्रेस नगरसेवक जनतेच्या प्रश्नावर गप्प का?

advertisement

अहमदनगर दि ६ मार्च
अहमदनगर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये सध्या फक्त खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यांमुळे महानगरपालिका रोजच टीकेचा धनी बनत आहे.

अहमदनगर शहर काँग्रेसने शहरातील रस्त्यांबाबत आणि बाजारपेठेतील रस्त्याबाबत सह्यांची मोहीम राबवून शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करावे अशी मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर दौऱ्यावर असताना त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये शहरातील रस्त्यांचा विषय होत असताना महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून 100 नवीन रस्ते तयार केल्याची माहिती दिली होती त्यावर काँग्रेसने या शंभर रस्त्यांची माहिती जाहीर करावी असे आव्हान दिल्यानंतर महानगरपालिकेने 133 रस्त्यांची यादी जाहीर केली आहे.

महानगर पालिकेने प्रसिद्ध केलेल्या या यादीमध्ये अनेक रस्ते दोनवेळा दाखवले असल्याचे आरोप काँग्रेसने केला आहे फक्त रस्त्यांची नावे बदलून तेच रस्ते यादीमध्ये समाविष्ट असल्याचा आरोप अहमदनगर शहर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.

रस्त्यामुळे नागरिक सध्या बेजार झाले असून शहरात धुळीचे साम्राज्य पसरले असताना अहमदनगर महानगरपालिकेच्या सत्ते मध्ये काँग्रेसचे नगरसेवक सहभागी असूनही त्यांनी मात्र मौन बाळगले आहे

.अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर असून राष्ट्रवादीचा उपमहापौर आहे तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी या सत्तेला पाठिंबा दिला असल्यामुळे त्यांनी मौन धारण केल्याने हा एक चर्चेचा विषय झालेला आहे.अहमदनगर शहर काँग्रेस रस्त्यांसाठी सह्यांची मोहीम घेत असताना आणि महापालिकेला जाब विचारत असताना या मध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक सामील झालेला नाही हे विशेष त्यामुळे काँग्रेसमध्ये दुफळी असल्याचं समोर येत आहे. जनतेच्या प्रश्नावर अहमदनगर शहर काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे मात्र सत्तेत सहभागी झालेले काँग्रेस नगरसेवक गप्प का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular