अहमदनगर दि.९ एप्रिल
हिरा, गोवा, आशा तंबाकूजन्य पदार्थांची विक्रीवर महाराष्ट्ट सरकारने बंदी घातली असली तरी चोरी छुपे या तांबकूजन्य पदार्थांची तस्करी सुरूच आहे दोन महिन्या पूर्वी कोतवाली पोलिसांनी एमआयडीसी परिसरात मोठी कारवाई करत गुटखा पकडला होता काही आरोपी अटक केले होतें मात्र त्याचा तपास मुळापर्यंत गेलाच नाही
त्या नंतर शहारत गुटख्याचा एकही मोठा छापा पडला नाही कारणही तसेच आहे महानगर पालिकेच्या एका पदाधिकऱ्याचा नातेवाईक “कु” हा गुटख्याच्या माफिया असून शहारासह जिल्ह्यात त्याच्याकडूनच मला सप्लाय केला जातो जिल्हाधिकारी कार्यालया जवळ एका गल्लीत एका घरात गोडाऊन असून त्या ठिकाणी गुटख्याच्या माल उतरवला जातो.
गुटख्याची कारवाई ही अन्न व औषध विभागाच्या अधिपत्या खाली येते मात्र मनुष्यबळ कमी असल्याचे सांगत हे कार्यालय कधीच स्वतःहून छापे टाकत नाही आज पर्यंत बहुतेक वेळा पोलिसांनीच गुटका तांबकूजन्य पदार्थांवर कारवाई केली आहे.
याचाच फायदा घेत तो “कु” ने जिल्ह्यात आपले बस्तान बसवले असून “कु” ला आडवे आले तर त्याला कसे बाजूला करायचे याचा फंडा त्याच्याकडे असल्याने त्यांच्या नादी कोणी लागत नाही मात्र अवैध गुटका विक्रीच्या साखळीत अनेक तरुण मुलांना गुंतवून चुकीच्या मार्गाला हा “कु” नेत आहे.
शहरातील राजकीय वलयाचा फायदा घेऊन हा “कु” राजरोस शहरात अवैध तांबकूजन्य पदार्थांची तस्करी करतोय.