Homeशहरशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीस गळती दुरुस्तीच्या कामामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीस गळती दुरुस्तीच्या कामामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत

advertisement

अहमदनगर दि १५ मार्च
मंगळवारी अहमदनगर शहरास पाणीपुरवठा करणारी नवीन मुख्य ११०० एम.एम. (PSC) जलवाहिनी बाभळगावजवळ लिकेज झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून या जलवाहिनीद्वारे मुळानगर येथून होणारा पाणी उपसा बंद करुन जलवाहिनी
दुरुस्तीचे काम मनपाच्या वतीने तातडीने हाती घेवून युध्द पातळीवर पूर्ण करण्यात येत आहे.

परंतु तांत्रिक अडचणीमुळे दुरुस्ती कामास अवधी लागणार आहे. तदनुसार सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता असून .मधल्या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे आज मंगळवारचा पाणी वाटप सुरु असलेल्या सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, विनायकनगर, आगरकर मळा, कायनेटीक चौक परिसर, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर भागास [सकाळी ११.०० नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास] पाणीपुरवठा होउ शकणार नाही. सदरचा पाणीपुरवठा हा बुधवारी होणार आहे.

तसेच बुधवार दि.१६-३-२०२२ रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्तगल्ली, माळीवाडा (काही भाग), माणिक चौक, आनंदी बाजार, जुने मनपा कार्यालय परिसर, पंचपीर चावडी, बालिकाश्रम रोड परिसर इत्यादी भागास पाणीपुरवठा होणार नसून या भागातील पाणीपुरवठा हा बुधवार ऐवजी गुरुवार दि.१७-३-२०२२ रोजी करण्यात येईल.

त्याचप्रमाणे गुरुवार दि.१७-३-२०२२ रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्र खुंट, कोठला, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको, सावेडी, सारसनगर व बुरुडगावरोड या भागातील पाणीपुरवठा हा गुरुवार ऐवजी शुक्रवार दि.१८-३-२०२२ रोजी करण्यात येईल.

तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मा.महापौर सौ.रोहिणी शेंडगे व मा.आयुक्त श्री.गोरे शंकर यांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular