Homeजिल्हाशहर पाणीपुरवठा योजनेवरील विदयुत पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने शहराचे मध्यवर्ती भागासह...

शहर पाणीपुरवठा योजनेवरील विदयुत पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने शहराचे मध्यवर्ती भागासह उपनगर भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत पुढील दोन दिवस पाणी काटकसरीने वापरा

advertisement

अहमदनगर दि.३ जानेवारी –

अहमदनगर शहर पाणीपुरवठा योजनेवरील महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीकडून होणा-या वीज पुरवठायामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होवून सोमवारी रोजी पहाटे पासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शहर पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेलाआहे.

घराचं स्वप्नां तुम्ही पहा पूर्ण आम्ही करू.प्लॉट, फ्लॅट, बंगले, मोकळा प्लॉट सर्व काही एकाच ठिकाणी         सार्थ  इस्टेट एजन्सी – 8999306565
वीज पुरवठा काही मिनीटे जरी खंडीत झाला तरी मुळानगर, विळद व नागापूर येथील कार्यरत पंपींग स्टेशन येथून पाणी उपसा सुरळीत होण्यास सुमारे दोन ते तीन तासाचा अवधी लागतो. त्यामुळे अनियमित पाणी उपसा होवून शहरातील वितरणासाठीच्या टाक्या वेळेत भरता येत नाहीत. पर्यायाने शहरास नियमीत व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
सोमवारी पहाटे पासून वीज वितरण कंपनीकडून होणारा वीज पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने मंगळवारी दि.४ रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, नालेगाव, माळीवाडा (काही भाग), चितळे रोड, कापडबाजार, माणीक चौक, नवीपेठ, तोफखाना, आनंदीबाजार इत्यादी भागासह सावेडी,बालिकाश्रम रोड परिसर इत्यादी भागास पाणीपुरवठा होणार नसून तो बुधवार दि.५ जानेवारी रोजी नेहमीच्या वेळेत करण्यात येईल.

घराचं स्वप्नां तुम्ही पहा पूर्ण आम्ही करू.प्लॉट, फ्लॅट, बंगले, मोकळा प्लॉट सर्व काही एकाच ठिकाणी         सार्थ  इस्टेट एजन्सी – 8999306565                                     तसेच शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. सततच्या खंडीत वीज पुरवठयामुळे नियमित पाणी उपसा होणेस अडचणी निर्माण होत असल्याने नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

घराचं स्वप्नां तुम्ही पहा पूर्ण आम्ही करू.प्लॉट, फ्लॅट, बंगले, मोकळा प्लॉट सर्व काही एकाच ठिकाणी         सार्थ  इस्टेट एजन्सी – 8999306565

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular