Homeशहरशहर वाहतूक शाखेच्या समोर अपघात वाहतूक शाखे समोरील सीसी टीव्ही शोभेलाच अवजवड...

शहर वाहतूक शाखेच्या समोर अपघात वाहतूक शाखे समोरील सीसी टीव्ही शोभेलाच अवजवड वाहतूक शहरातून होतेच कशी?

advertisement

अहमदनगर दि.२९ मार्च
अहमदनगर शहरात पत्रकार चौकात दुचाकी आणि ट्रकच्या अपघाता मध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला विशेष म्हणजे हा अपघात शहर वाहतुकीच्या कार्यालया समोर झाला असून नेहमी प्रमाणे या ठिकाणचा सिग्नल बंद होते या ठिकाणी चौकात लावलेले सीसी टीव्ही शोभेला लावलेले असल्याच निदर्शनास आले आहे.

अपघात झाल्या नंतर पत्रकार चौकात अनेकांनी धाव घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव विधाते,अभिजीत खोसे माजी नागरसेवक अजिंक्य बोरकर ,रेश्माताई आठरे,दीपक खेडकर हे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची भेट घेण्या करीता गेले असताना अपघाताबाबत माहिती विचारली असताना तुम्ही लोकांना विचारलं का असं उत्तर दिले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि पोलीस निरीक्षक भोसले यांची चांगलीच खडाजंगी झाली.
शहरातून अवजड वाहतूक होऊ देऊ नये म्हणून काही दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी शहर वाहतूक शाखेत जाऊन जड वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती त्या नंतरही शहरातून अवजड वाहतूक होत आहे.

शहरातून होत असलेली जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी तसेच पत्रकार चौकात असलेले सीसीटीव्ही चालू करावेत अपघाता समयी या चौकात कर्मचारी होता का नव्हता याबाबत तपास करून हा मलवाहू ट्रक शहराच्या आत आला कसा तसेच या अपघाताबाबत जबाबदार असलेल्या लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे भविष्यात शहरातून जड वाहतूक बंद झाली नाही तर शहर वाहतूक शाखेत तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular