अहमदनगर प्रतिनिधी
गिरीश जाधव यांनी डॉक्टर सुनील पोकरणा यांच्या जामीन अर्ज बाबत हस्तक्षेप करावा का नाही याबाबत आता बुधवारी सुनावणी होणार असून अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालय मध्ये आग लागून ११ जणांचा मृत्यू झाला होता यामध्ये पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह तीन परिचरिकांना अटक करण्यात आली होती सध्या न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. तर या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखर्णा यांनी न्यायालयात धाव घेत अंतरीम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर न्यायालयाने काही अटी शर्तींवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. याच अंतरीम अटक पूर्वअर्जावर गिरीश जाधव यांनी न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करत डॉक्टर सुनील पोखरणा यांना जामीन देऊ नये अशी मागणी केली होती. मात्र जाधव यांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का नाही याबाबत आज न्यायालय मध्ये दोन्ही बाजुंनी युक्तिवाद झाला.आता गिरीश जाधव यांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का नाही याबाबत बुधवारी न्यायालय निर्णय देणार आहे.