अहमदनगर दि.१४ एप्रिल
केडगावचे शिवसेना नगरसेवक अमोल येवले यांना खुनाची धमकी देणाऱ्या आकाश पवार याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने हे कृत्य दारूच्या नशेत केलं असल्याचे समोर आले आहे.
केडगावचे नगरसेवक अमोल येवले यांना फोन करुन ‘मला तुझी सुपारी मिळाली असून, तुझा मर्डर करणार आहे’, असा दम दिला. त्याचा भाऊ सचिन पवार याला फोन केला असता, त्यानेही आकाश याला तुला मारण्यासाठी तीन कोटींची सुपारी मिळाली आहे, असे सांगितल्याची तक्रार येवले यांनी दिली होती.
. तर हॉटेल सागर समोर लावलेल्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी अभिजीत अर्जुन कोतकर यांनी सुद्धा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता हॉटेल समोर येऊन अज्ञात तीन लोकांनी गाड्यांची तोडफोड करत अमोल येवले यांना मारण्याची सुपारी भेटल्याचा या लोकांनी आरडाओरड करत सांगितलं होतं.
या आरोपीने हा सर्व प्रकार दारूच्या नशेत केल्याने त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्याच्यावर हॉटेल मधील गाडीच्या तोडगोड प्रकरणातही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती
कोतवाली पोलीस ठाण्याचे सहह्याक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी दिलीय