अहमदनगर दि १३ जानेवारी
महापालिका पोटनिवडणुकीच्या काळात केडगावमध्ये ७ एप्रिल २०१८ रोजी शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे व संजय कोतकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपींकडून सुवर्णा कोतकर यांच्या बद्दल माहिती तपास करणाऱ्या सीआयडीच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे सीआयडीने सुवर्णा कोतकर यांचे नाव या गुन्ह्यात नोंदविले. तेव्हापासून कोतकर फरारी होत्या.
काही दिवसांपूर्वी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला होता. सुरुवातीला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता.या अर्जावर जिल्हा न्यायाधीश अमित शेटे यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. केदार केसकर यांनी तर आरोपीतर्फे अॅड. नितीन गवारे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कोतकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता
तेव्हा पासून सुवर्णा कोतकर या फरारी होत्या मात्र आता त्यांना जामीन मिळाला असून अहमदनगर जिल्हा सत्र न्यायाधीश कुर्तीडीकर यांनी कोतकर यांचा जमीन मंजूर केला आहे. काही अटी आणि शर्तींवर हा जामीन मंजूर केला आहे कोतकर यांच्या वतीने व्ही बी म्हसे पाटील संजय दुशिंग ,महेश तवले, संजय वालेकर, सागर वावळ यांनी काम पाहिले होते