अहमदनगर शहर प्रमुख म्हणून शिवसेनेच्या दिलीप सातपुते यांची गच्छंती झाल्यानंतर आता या जागेवर संभाजी कदम यांची नव्याने नियुक्ती झाली आहे संभाजी कदम यांनी यादी शहर प्रमुख म्हणून या आधी जबाबदारी पार पाडली आहे. शहर प्रमुखाच्या स्पर्धेत शिवसेनेतील अनेक मातब्बर नगरसेवक तसेच माजी नगरसेवक होते मात्र अखेर संभाजी कदम यांच्या गळ्यात ही माळ पडली आहे आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. प्रभाग क्रमांक ९ क पोटनिवडणूक ही त्यांच्यासाठी आता सर्वात पहिली परीक्षा असणार आहे.