HomeUncategorizedशिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून 'हे माजी नगरसेवक' भरणार उमेदवारी अर्ज पोस्ट झाल्या...

शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून ‘हे माजी नगरसेवक’ भरणार उमेदवारी अर्ज पोस्ट झाल्या व्हायरल

advertisement

अहमदनगर –
प्रभाग क्रमांक 9 को च्या निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीचे सरकार असून त्याच धर्तीवर महापालिकेची ही पोटनिवडणूक होणार का याबाबत अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक श्रीपाद छिंदम यांचे पद रद्द करण्यात आले होते. त्यानंतर ही निवडणूक होत असून सध्या सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून माजी नगरसेवक सुरेश तिवारी यांचा अर्ज उद्या भरणार असल्याची पोस्ट सध्या व्हायरल होत असून यामुळे सर्वच पक्षात खळबळ उडाली आहे काय आहे ही पोस्ट पहा.

प्रभाग क्रमांक 9 शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मा.सुरेश तिवारी यांचा उद्या सकाळी 12 वा. जुनी महानगर पालिका येथे उमेदवारी अर्ज भरणार आहे तरी सर्व शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे. — शिवसेना नगर शहर.

ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून एकीकडे काँग्रेस शिवसेनेबरोबर बोलणी करत आहे असे सांगत आहे तर शिवसेनेने थेट उमेदवार जाहीर करून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ही व्हायरल पोस्ट खरी का खोटी याबाबत शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांच्याशी संपर्क साधला असता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र आता याबाबत शहरात जोरदार चर्चा आहे.

Warning
Warning
Warning
Warning

Warning. Please fill out the form correctly.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular

22:32