Homeजिल्हाशेतकऱ्यांची वीज तोडण्याचा महावितरण ने अडमुठेपणा सोडून द्यावा अन्यथा शेतकरी पेटून उठेल-...

शेतकऱ्यांची वीज तोडण्याचा महावितरण ने अडमुठेपणा सोडून द्यावा अन्यथा शेतकरी पेटून उठेल- जिल्हा परिषदसदस्य हर्षदाताई काकडे

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी
महावितरण कडून दोन वीज बिलांची वसुली केली जात असून जर हे बिल भरले नाही तर विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.या वर्षी शेतकरी कोरोना आणि अतिवृष्टीच्या संकटातून थोडा सावरत असताना आता महावितरणने हे सुलतानी संकट समोर आणले आहे. शेतकऱ्यांना दोन बिले भरण्यास शक्य होणार नाही दोन बिलापोटी पाच हजार किंवा त्यापेक्षा जास्त भरणा भरता येणार नाही. मात्र सर्वसामान्य शेतकरी प्रत्येकी तीन हजार रुपये भरण्यास तयार आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने तीन हजार रुपये भरण्याची सवलत दिल्यास शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा मिळेल व शेतकरी तीन हजार रुपये भरू शकेल पूर्वीच्याआदेशातही तीन हजार रुपये भरण्याचा निकष ठेवला होता.त्यामुळे महावितरण ने अडमुठी भूमिका न ठेवता तीन हजार रुपये भरण्याची मुभा शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी करत जनशक्ती चे संस्थापक अध्यक्ष ऍड. शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. या आंदोलनात किशोर दहिफळे ,बाबुशा मडके, रामकिसनभडके,विजय आंधळे, सुभाष आंधळे, मनोहर मडके, किसन झुंबड, राजेंद्र पोटफाडे, दत्तात्रय पोटफाडे ,सुरेश चौधरी, जगन्नाथ गावडे ,आदी शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते

या सर्व शेतकरी आणि जनशक्ती संस्थेचे संस्थापक ऍड. शिवाजी काकडे व जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी महावितरण कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच या मागण्यांवर गंभीर विचार केला नाही तर पुढील काळात या आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शिवाजीराव काकडे आणि हर्षदा ताई काकडे यांनी दिला आहे महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळ वसुलीचा मुद्दा घेऊन गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अचानक पणे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांची शेतीचे पंपाचा वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिके जगवण्याचा चा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या ग्रामीण भागामध्ये पिकांना पाणी देण्याची अत्यंत आवश्यकता भासत असताना महावितरने आडमुठेपणा सोडून द्यावा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या रब्बी हंगाम वाया जाण्याची दाट शक्यता असल्याने ेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular