कर्जत ८ मार्च
उन्हाळ्याची प्रखरता जाणवू लागल्याने शेतीसाठी पाणी देण्यासाठी ग्रामीण भागात शेतकरी रात्रंदिवस शेतीवर थांबून आहेत मात्र पूर्ण दाबाने आणि सलग वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत तर दुसरीकडे नादुरुस्त रोहित्र आणि सक्तीच्या वीज वसुली मुळे शेतकऱ्यांचे जीवन जगणे मुस्किल झाले असून या प्रश्नावर भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याच्या वतीने माजी मंत्री प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 9 मार्च रोजी भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करणार आहेत अशी माहिती जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी दिलीय.
शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने सलग 10 तास वीज मिळावी , नादुरुस्त रोहित्रे ( D P ) 24 तासात बदलून मिळावीत व पठाणी पद्धतीने चालू असलेली वीज वसुली त्वरित थांबवावी कुकडीच्या अवर्तनाचा गेली अडीच वर्षात झालेला खेळखंडोबा व अनियमित आवर्तन सुधारावे व जळायला लागलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांसाठी लगेच एक आवर्तन तातडीने मिळावे,उसउत्पादक शेतकऱ्यांना उसतोडीला उशीर होऊन होऊ घातलेल्या नुकसानी होत असल्याने तातडीने ऊसतोड टोळ्या मिळाव्यात व कारखान्यांनी ऊस उचलावा या प्रमुख मागण्यांसाठी दिनांक 9 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता श्री.महासाती अक्कबाई मंदिर ते कर्जत तहसील चौक पर्यन्त भव्य मोर्चा व रस्ता रोको आंदोलन करण्याचे आयोजन करण्यात आले असून कर्जत मधील शेतकरी ,व्यापारी, उसउत्पादक शेतकरी या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती सरचिटणीस सचिन पोटरे यांनी दिलीय.
माजी मंत्री राम शिंदे यांचा कर्जत जामखेड मतदार संघात पराभव झाल्यानंतर मधल्या काळात माजी मंत्री राम शिंदे कर्जतच्या राजकारणात फारसे सक्रिय नव्हते कारण त्यांच्या चौंडी गावातच ग्रामपंचायत निवडणूकी मध्ये राष्ट्रवादीचे समर्थक निवडून आले होते त्यानंतर कर्जत नगरपंचायती मध्ये राष्ट्रवादीचा झेंडा लागला त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपचे माजी मंत्री राम शिंदे कर्जत जामखेड मध्ये सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.