अहमदनगर दि १४ मार्च
श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे पाऊण तास उत्तरासहित प्रश्नपत्रिका विध्यार्थ्यांच्या मोबाईल व्हाट्सअप वर आल्याची खबर सोशल मीडियात आल्या नंतर अहमदनगर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला होता.
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने श्रीगोंदा येथे जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली वास्तविक पाहता पेपर साडेदहा वाजता सुरू झाल्यानंतर या पेपरची प्रश्नपत्रिका 11:25 मिनिटांनी सोशल मीडियावर आल्याचा दावा अमदनगर माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांनी केला आहे.
तरीपण याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद होणार असून पुढील तपासात ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर कोणी टाकली तसेच ही विद्यार्थ्यांपर्यंत किती वाजता पोहोचली याबाबत सर्व सत्य समोर येईल अशी माहिती शिक्षणाधिकारी कडूस यांनी दिली आहे.