आवाज महाराष्ट्राचा विशेष – सुथो
अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ (क)या प्रभागाची पोटनिवडणूक लागली असून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता लगबग सुरू झाली आहे ते उमेदवारांची आणि राजकीय पक्षांची. मात्र ही निवडणूक का लागली यावर एक नजर टाकूया कारण प्रभाग क्रमांक ९ (क) हा नगरमध्ये नाही आख्या महाराष्ट्रामध्ये या प्रभाग क्रमांक ९ (क) ची चर्चा झाली होती. काय घडले होते प्रभाग क्रमांक ९ (क) मध्ये.टाकूया एक नजरसुथो
प्रभाग क्रमांक ९ (क) म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करुन चर्चेत आलेला भारतीय जनता पार्टीचा माजी महापौर श्रीपाद छिंदम यांचा प्रभाग. २०१८ साली फेब्रुवारी महिन्यामध्ये फोनवरील संभाषणादरम्यान शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर छिंदम चर्चेत आला होता. या प्रकरणामध्ये त्याला त्याचं पद गमवावं लागलं होतं. तसंच त्याला भाजपानेही पक्षाबाहेर हाकललं होतं. श्रीपाद छिंदम यांचा राजकीय प्रवाससुथो काँग्रेस, शिवसेना आणि भाजप असा राहिला. ही क्लिप वायरल झाल्यानंतर श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली अनेक संघटनांनी त्याच्याविरुद्ध मोर्चे ,आंदोलनही केले. त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.छिंदम याने या प्रकरणी जाहीर माफी मागितली होती. अहमदनगर महानगर पालिकेच्या सभागृहात छिंदम यांचं नगरसेवकपद रद्द करून त्यांना निवडणूक लढवण्यापासून दूर ठेवावं अशी मागणी करून ठराव करण्यात आला. त्याविरोधात छिंदम यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे अपील केलं. मंत्री रणजित पाटील यांनी सुनावणीही घेतली. मात्र छिंदम प्रकरणावरचा निकाल ३ महिने यावर सुनावणी न घेता लटकवून ठेवला आणि तो पर्यंत निवडणूक लागली आणि श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्यासुथो रिंगणात उतरला. छिंदम या निवडणुकीत उतरला आणि या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सर्व महाराष्ट्राच्या नजरा ९ (क) प्रभागा कडे लागून राहिल्या आणि श्रीपाद छिंदम मोठ्या मतांनी पराभूत होईल असे सर्व शिवभक्तांना वाटत असताना मात्र इतिहास घडला आणि श्रीपाद छिंदम पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आला. या निवडणुकीत भाजप, शिवसेना राष्ट्रवादी मनसे या सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना श्रीपाद छिंदम याने धूळ चारली छिंदम यांच्या प्रभाग ९ (क) मधील उमेदवारांना पडलेल्या मतांवर नजर टाकूयात. इथं भाजपच्या प्रदीप परदेशींना २५६१ मतं मिळाली. शिवसेनेच्या सुरेश तिवारींना १६१३ मतं, मनसेच्या पोपट पाथरे यांना ,१४२५ तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या अनिता राठोड यांना फक्त ७१५मतं मिळाली. तर श्रीपाद छिंदम यांना ४५३२ मतं मिळाली. म्हणजे छिंदम यांनासुथो पद्मशाली समाजासह इतर समाजातील मतदारांनीही मतदान केल्याचं स्पष्ट आहे.
श्रीपाद छिंदम प्रभाग ९ (क) मधून आठशे मतांच्या मताधिक्याने निवडून आला. या प्रभागात १२ हजार२२९ मतदान होते . त्यात पद्मशाली समाजाची२५०० मतं होती. तर अहमदनगर शहरात पद्मशाली समाज मोठा असल्याने या मतांची किंमत राजकीय नेत्यांना होती आणि लोकसभा आणि विधानसभेत या मतांची गरज लागते म्हणून या निवडणुकीमध्ये अनेक मंत्री राजकीय पुढारी अनेक मातब्बर नेते नगरमध्ये येऊन गेले मात्र कोणीही श्रीपाद छिंदम बद्दल एक शब्दही काढला नाही कारण प्रत्येकाला पुढील राजकीय खेळी खेळायची होती. त्यामुळे सर्वांनी चुप्पी साधली होती. २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लागली आणि श्रीपाद छिंदम यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं विशेष म्हणजे त्याला मायावतीच्या बहुजन समाज पक्षाने तिकीट ही दिले होते. महाविकासआघाडी चे सरकार स्थापन झाल्या नंतर नगरविकास खात्याने फेब्रुवारी २०२० मध्ये छिंदमचे पद रद्द केले होते. या आदेशाविरोधात छिंदम याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी जानेवारी २०२१ मध्ये छिंदमचा अर्ज फेटाळला. त्यानंतर आता ती जागा नगरसेवक अपात्रतेमुळे रिक्त झाल्याचे घोषित करून राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला असून आता या प्रभाग क्रमांक ९ (क) मध्ये कोण निवडून येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तसेच श्रीपाद छिंदम यांच्या कुटुंबातील कोण या निबडणुकीच्या मैदानात उतरणार या कडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. मात्र ही निवडणूक आणि पुढच्या निवडणुकीचा कालावधी पाहता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध केली तर निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते त्याचा डाग ९ (क)या प्रभागावरून पुसण्यासाठी नक्कीच मदत होईल असेही काही राजकीय कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले आहे.