Homeविशेषसंरक्षण मंत्रालयाणे छावणी मंडळातील रोडवर आकारल्या जाणाऱ्या वाहन प्रवेश शुल्क आकारण्यावर घातली...

संरक्षण मंत्रालयाणे छावणी मंडळातील रोडवर आकारल्या जाणाऱ्या वाहन प्रवेश शुल्क आकारण्यावर घातली बंदी

advertisement

पुणे-९ जानेवारी –

लोकांच्या अनेक तक्रारींनंतर संरक्षण मंत्रालयाने (MoD) कॅन्टोन्मेंट बोर्डांद्वारे वाहन प्रवेश शुल्क वसूल करण्यास बंदी घातली आहे.

त्यानुसार खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने (केसीबी) आज दुपारपासून शुल्क वसूल करणे बंद केले आहे. पुणे कॅन्टोन्मेंटनेही वाहनांचे प्रवेश शुल्क बंद केले आहे. अनेकजण फी भरण्यासाठी नाक्यावर थांबलेले दिसले. मात्र पैसे वसूल करणारे कर्मचारी नव्हते.

7 जानेवारी 2022 रोजी देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांना लिहिलेल्या पत्रात, डायरेक्टरेट जनरल डिफेन्स इस्टेट्स (DGDE) चे सहाय्यक DG (Cantts) दमन सिंग यांनी त्यांना वाहन प्रवेश शुल्क (VEF) घेणे तात्काळ थांबवण्यास सांगितले.

असे निदर्शनास आले आहे की कॅन्टोन्मेंट बोर्डांद्वारे बॅरिकेड्स/नाके/कलेक्शन नाके बसवून वाहनांचे प्रवेश शुल्क वसूल करणे हे रहदारी सुरळीत होण्याच्या दिशेने सरकारच्या पुढाकाराला अनुरूप नाही रहिवासी पादचारी प्रवाशी यांना प्रवास करण्यास सुलभ करण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण करते असे वाटत असल्याने हे नाके बंद करण्यात येत आहेत.

त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून वाहन प्रवेश शुल्काची वसुली तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular