Homeक्राईमसतरा ठिकाणी बंद घरात प्रवेश करून चोऱ्या करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने...

सतरा ठिकाणी बंद घरात प्रवेश करून चोऱ्या करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद २३ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांकडून जप्त

advertisement

अहमदनगर दि २८ फेब्रुवारी

अहमदनगर जिल्हयात काही दिवसांपासून दिवसा बंद घरांचे कुलूप तोडून चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढले होते या मुळे पोलिसांवर टीकाही करण्यात आली होती मात्र पोलिसांनी आपला तपास सुरू ठेवत अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी, शेवगांव व राहुरी परिसरामध्ये आशा एकूण सतरा ठिकाणी बंद घरात प्रवेश करुन जबरी चोरी व घरफोडी करणारी बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी ४२ तोळे (४१९ ग्रॅम) सोन्याचे दागिणे, रोख रक्कम व तीन मोटार सायकल असा एकुण २३,५२,५००/-रु. किं.चे मुद्देमालासह जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली असून सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका हद्दीतील चास गावात आनंदा बबन घुगार्डे हे कुटूंबासह कामानिमित्त बाहेर गेले असतांना अनोळखी चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडुन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण २,३२,६००/- रु.किंमतीचा ऐवज घरफोडी करुन चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

त्याच प्रमाणे श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी, शेवगांव, व राहुरी परिसरामध्ये अशा प्रकारचे जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे घडलेले असल्याने पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक
अनिल कटके यांनी गुन्ह्याचे समातंर तपासकामी
स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमून तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

त्या प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/सोमनाथ दिवटे, पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/सुनिल
चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, विजय वेठेकर, बबन मखरे, संदीप घोडके, संदीप पवार, विश्वास बेरड, भाऊसाहेब कुरूंद, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन आडबल, संदीप चव्हाण, विजय ठोंबरे,रवि सोनटक्के, दिपक शिंदे, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, पोकॉ/रविंद्र धुंगासे, योगेश सातपुते, जालिदर माने, रोहित मिसाळ, राहुल सोळंके, आकाश काळे, सागर ससाणे, मयुर गायकवाड, रणजित जाधव, मच्छिद्र बर्डे, मेघराज कोल्हे, विनोद मासाळकर, चापोहेकॉ/संभाजी कोतकर, बबन बेरड व चंद्रकांत कुसळकर आशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम गुन्ह्याचा तपास करीत असताना पोनि अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हा हा बीड जिल्ह्यातील आष्टी येथील सराईत गुन्हेगार राम बाजीराव चव्हाण, व त्याचे साथीदारांनी मिळून केलेला असून राम चव्हाण व त्याचे साथीदार हे चोरलेले सोन्याचे दागिण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी लाल व काळ्या रंगाच्या शाईन व युनिकॉन मोटार सायकलवर अहमदनगर येथे येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर जामखेड रोड येथे जावून आठवड घाटात आष्टी कडुनअहमदनगरच्या दिशेने तीन मोटार सायकली त्यात एक लाल व एक काळ्या रंगाची हिरो होंडा शाईन व एक होंडा कंपनीची युनिकॉन मोटारवर प्रत्येकी दोन-दोन इसम येत असतांना दिसले पोलीस पथकाची खात्री होताच सदर इसमांना थांबण्याचा इशारा करताच ते पळुन जाण्याचे तयारीत असतांना पोलीस पथकाने दोन मोटार सायकलवरील चार संशयीत इसमांना पाठलाग करुन, ताब्यात घेतले. तसेच त्यांचे पाठीमागील युनिकॉन मोटार सायकलवरील दोन इसम मोटार सायकल तेथेच टाकुन घाटामध्ये पळून गेले

 

बाजीराव चव्हाण वय २०, रा. आष्टी, जिल्हा बीड, २) तुषार हबाजी भोसले, रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड, प्रविण उर्फ भाज्या हबाजी भोसले, ४) विनाद हबाजी भोसले, दोन्ही रा. पिंपरखेड, ता. आष्टी जिल्हा बीड असे
या दोघांना ताब्यात घेतले असून या आरोपींवर अहमदनगर जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातही गंभीर गुन्हे दाखल असून या आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

नागरिकांनी बाहेरगावी जाताना आजूबाजूच्या नागरिकांना सांगून द्यावे तसेच घराच्या अवतीभोवती सीसीटीव्ही बसवावे असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नागरिकांना केले आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular