अहमदनगर दि.११ डिसेंबर
अहमदनगर एमआयडीसी मधील सन फार्मा कंपनीमध्ये बुधवारी रात्री आग लागून रावसाहेब मघाडे या कर्मचऱ्याचा होरपळून मृत्यू झाला होता मात्र हा कर्मचारी इतकी मोठी आग असताना थेट आत मध्ये पोहचलाच कसा हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कामगार मंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी कंपनीला भेट देऊन पाहणी केली होती त्या वेळी त्यांनी कंपनीच्या सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ठेकेदाराला हाच प्रश्न विचारला होता की या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतात का? ठेकेदारांनी उत्तर देताना सांगितले की या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात असतो मात्र हा कर्मचारी कधी गेला हे सुरक्षारक्षकाला सुद्धा माहित नाही त्यामुळे मग एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये सुरक्षारक्षक असतानाही तो कर्मचारी आगीच्या ठिकाणी पोहोचलास कसा हा प्रश्न तपासाअंती समोर येईल त्यामुळे याप्रकरणी आता स्वतः पोलिसांनी फिर्यादी होऊन या घटनेचा तपास करावा आणि या कर्मचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत कोण असेल त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी आठ तास उलटूनही जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही तक्रार न आल्याने अखेर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये या अग्नितांडव प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.त्यामुळे सन फार्मा कंपनी बाबतीतही पोलिसांनी फिर्यादी व्हावे व गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे