Homeजिल्हासमता विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी भरत पवार तर सचिवपदी चंद्रकांत खुळे यांची निवड

समता विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी भरत पवार तर सचिवपदी चंद्रकांत खुळे यांची निवड

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी-

अहमदनगर शहरातील सावेडी भागातील समतानगर येथील समता विकास प्रतिष्ठानच्या कार्यकारिणी सदस्यांची नुकतीच निवड झाली होती त्यांच्यामधून अध्यक्ष म्हणून भरत पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब मगर, सचिव चंद्रकांत खुळे तर खजिनदार म्हणून दत्तात्रय रच्च| यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ही निवड २०१९ ते २०२६ या कालावधीसाठी करण्यात आली असून सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे अध्यक्षपदाच्या माध्यमातून समता विकास प्रतिष्ठानचा नावलौकिक कसा वाढेल तसेच समाज उपयोगी कामे आपल्या हातून कसे होतील याबाबत पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचं भरत पवार यांनी यावेळी सांगितलं मावळते अध्यक्ष सुधाकर शिदोरी आणि सचिव सूर्यवंशी यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी डॉ. प्रकाश जाधव, सुधाकर गोहाड, विजय धामणे ,काशिनाथ वाणी, नवनाथ धुमाळ, रवींद्र शितोळे, सुशील थोरात ,राजेंद्र भिसे, जयराम बोरकर, मंगेश जाधव कैलास साळुंके आदी नवीन विश्वस्त उपस्थित होते. मंदिराच्या आसपास असलेल्या मोकळ्या जागे मध्ये खुली व्यायाम शाळा बनवण्याचा मानस सर्व सदस्यांनी व्यक्त केला तसेच प्रतिष्ठान तर्फे या भागातील रहिवाशांना अजून काही सुविधा देता येतील का याबाबत पुढील काळात सर्वजण मिळून प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सदस्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular