Homeसांस्कृतिकसहा फेब्रुवारीच्या भव्य शिवतीर्थ लोकार्पण कार्यक्रमाची महाराष्ट्रभर चर्चा,नेमका कार्यक्रम काय शिवप्रेमींना लागली...

सहा फेब्रुवारीच्या भव्य शिवतीर्थ लोकार्पण कार्यक्रमाची महाराष्ट्रभर चर्चा,नेमका कार्यक्रम काय शिवप्रेमींना लागली उत्सुकता

advertisement

अहमदनगर दि.५ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील चौकाचौकांमध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण असे भव्यदिव्य बोर्ड लागले आहेत मात्र नेमका हा कार्यक्रम काय असेल याबाबत अनेक नागरिकांना उत्सुकता लागून आहे.

कारण अहमदनगर शहरामध्ये माळीवाडा बस स्थानका शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडयावर स्वार झलेला पुतळा अनेक वर्षांपासून आहे, मग हा पुतळा बदलणार का? किंवा अजून काही वेगळे पाहायला मिळणार असे अनेक प्रश्‍न सध्या नगरकरांना पडत आहेत.

मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पहिल्यापासून याठिकाणी बसवलेला आहे. मात्र या कार्यक्रमाबद्दल आता सर्व शिवप्रेमींना उत्सुकता लागली असून या कार्यक्रमाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली आहे.

कारण या कार्यक्रमाच्या आयोजकांनी जाहिरातीची जी युक्ती वापरली आहे त्यामुळे हा कार्यक्रम नेमका काय आहे याची उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वाच शिवप्रेमींना असून औरंगाबाद येथे नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यात आला होता त्यामुळे नगर शहरात पुन्हा तसाच पुतळा उभारतोय काय अशीही चर्चा काही ठिकाणी रंगली असून सहा फेब्रुवारी रोजी या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून आकर्षक लाईट डेकोरेशन तसेच शिवशाही संचारेल असे पोवाडे गाण्याच्या धून आणि शिवकालीन पेहरावात असणारी माणसे या ठिकाणी पाहायला मिळतील असा भव्यदिव्य स्मरणात राहील असा देखणा सोहळा करण्यासाठी सर्वच शिवप्रेमी अनेक दिवसांपासून राबत आहेत .

सध्या सोशल मीडियावर आणि अनेक तरुणांच्या डीपीवर सुद्धा या कार्यक्रमाचे व्हिडीओ दिसू लागले असून शहारा मध्ये ठिकठिकाणी या कार्यक्रमाबाबत चर्चा चालू आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular