Home विशेष सार्वजनिक ठिकाणी मद्यापान करून गैरवर्तन करणे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला पडले महाग...

सार्वजनिक ठिकाणी मद्यापान करून गैरवर्तन करणे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला पडले महाग झली तडकाफडकी निलंबनची कारवाई

मुंबई दि 3 मार्च

राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक आणि तत्कालीन साताऱ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या कारनाम्यामुळे चर्चेत होते.

स्वत:च्या वाहनावर लाल दिवा लावून फिरणे, महत्त्वाच्या बंदोबस्तावेळी, मुख्यालयाची परवानगी न घेता बाहेर फिरणे,सार्वजनिक ठिकाणी मद्यापान करुन गैरवर्तन करणे.याचायसह विद्युत विभागाच्याही अनेक तक्रारी होत्या तसेच लोकआयुक्तांकडे तक्रार दाखल असल्याने राज्य सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.

धीरज पाटील यांच्या निलंबनाचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने काढले आहेत.तसेच त्यांची बदली होमगार्ड विभागात केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version