Homeजिल्हासावधान अहमदनगर जिल्ह्याची आकडेवारी वाढू लागली पुन्हा कडक निर्बंध नको असेल तर...

सावधान अहमदनगर जिल्ह्याची आकडेवारी वाढू लागली पुन्हा कडक निर्बंध नको असेल तर घ्या ही काळजी

advertisement

अहमदनगर दि.७ जानेवारी

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना आकडेवारी चा आलेख खाली गेला होता मात्र पुन्हा एकदा हा अलेख वर येताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्र पुन्हा कोरोनाच्या संकटात सापडत असल्याचे दिसत असतानाच अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत नव्या १७० करोना रुग्णा सापडले असून नगर शहरात सर्वाधिक ५९ रुग्ण आहेत. तर त्या खालोखाल राहाता तालुक्यात १७  आणि नगर तालुक्यात १५  रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधा बाबत नागरिक अजूनही उदासीन असल्याचे दिसून येत आहे. पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन तसेच ग्रामपंचायत स्तरावर प्रशासनाने दिलेल्या सूचनांच्या पालन करण्यासाठी अनेक ठिकाणी विविध कारवाया केल्या जातात मात्र मास्कचा वापर फार कमी ठिकाणी होताना दिसतोय.जिल्ह्यात अनेक ठिकाणी अजूनही मोठे कार्यक्रम सुरू आहेत त्यामुळे कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून आले आहे.अहमदनगर जिल्हा अनेक दिवस रेडझोन मध्ये होता मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये नगर जिल्ह्याला दिलासा मिळाला होता मात्र पुन्हा एकदा आपला जिल्हा रेड झोन मध्ये जाण्यापासून वाचवायचा असेल तर नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular