Homeविशेषसावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक नटला विविध रंगांनी !

सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक नटला विविध रंगांनी !

advertisement

अहमदनगर दि.८ जानेवारी
अहमदनगर शहरातील उपनगरा मधील प्रोफेसर कॉलनी चौक आता विविध रंगानी नटला आहे काही दिवसांपूर्वीच अहमदनगर महानगरपालिकेने प्रोफेसर चौक ते प्रेमदान चौक या मार्गावर रस्ता दुभाजक लावले होते आता या रस्ता दुभाजकावर विविध आकर्षक रंग देण्याचे काम सुरू असून यामुळे प्रोफेसर कॉलनी चौक चांगलाच उजळून निघणार आहे.

उपनगरामधील अत्यंत महत्त्वाचा चौक म्हणून या चौकची ओळख झाली असुन रात्रीच्या वेळेस या ठिकाणी मोठी चौपाटी लावली जाते. या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या चौकाची वेगळी ओळख निर्माण झाली असून. महानगरपालिकेने रस्ता दुभाजकास आकर्षक रंग देऊन या चौकाचे सौंदर्य वाढवले आहे.

या ठिकाणी असलेले महानगरपालिकेच्या मालकीचे शॉपिंग सेंटर अत्यंत जुने झाले असून ते पाडून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज अशी मोठी इमारत बांधण्यासाठी महापालिकेने योजना केली आहे. मात्र या ना त्या कारणाने जुने शॉपिंग सेंटर पाडण्यास विरोध असल्याने ही योजना सध्या बसनात बांधून ठेवली आहे.मात्र आता पुन्हा हे शॉपिंग सेंटर पाडण्याच्या हालचाली सुरू असून या ठिकाणी भव्य दिव्य असे मोठे कॉम्प्लेस उभारून व्यावसायिकांना संधी उपलब्ध करून देण्याचा मानस महापालिका प्रशासनाचा आहे. त्यामुळे या चौकाचे सौंदर्य अजूनच वाढेल. तसेच यामुळे महानगरपालिकेला मोठे आर्थिक उत्पन्न सुरू होईल.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular