पुणे दि २५ फेब्रुवारी
पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त आणि सध्याच्या सीआरपीएअफच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यातील अनेक महत्वाच्या राजकीय लोकांचे फोन टॅपींग करुन गोपनीय माहीती उघड केल्याप्रकरणी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यानंतर दुसऱ्या बड्या अधिकाऱ्यावर महाविकास आघाडी सरकारकडून कारवाई करण्यात आहे.
रश्मी शुक्ला आयपीएस अधिकारी असून त्यांनी पदाचा दुरुपयोग करत राज्य सरकारची गोपनीय माहिती लिक केली असा आरोप त्यांच्यावर आहे. परमवीर सिंग यांच्यानंतर दुसऱ्या आयपीएस अधिकारी विरोधात महाविकास आघाडी सरकारची ही मोठी कारवाई आहे.