Homeविशेषसोशल मीडियावरील या घाणेरड्या नवीन ॲप पासून सावध राहा अन्यथा होऊ शकते...

सोशल मीडियावरील या घाणेरड्या नवीन ॲप पासून सावध राहा अन्यथा होऊ शकते आपले बँक खाते रिकामे समाज माध्यमात होऊ शकते आपली मानहानी

advertisement

अहमदनगर दि.३ जानेवारी
सध्या तरुणाई सोशल मीडियावर जास्त व्यस्त असते आणि याचाच फायदा घेत अनेक खोटे ॲप फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा काम काही सोशल माडीया हॅकर्स करत असतात. नकळत फेसबुक आणि व्हाट्सआप च्या माध्यमातून ते आपल्याला जाळ्यात ओढतात आणि मग बदनामी च्या भीतीने आपले बँक खाते रीकामे होत राहते.

फ्री मध्ये मुलींशी चॅटिंग करा किंवा घाणेरड्या गप्पा मारा आशा विविध प्रकारचे ॲप फेसबुक वर येतात आणि उत्सुकते पोटी तो ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड केला तर आपण त्यांच्या जाळ्यात अडकण्यास सुरुवात होते. तरुण मुले या ॲप च्या भूलभुलैयात जातात आणि नको ते फोटो, व्हिडीओ, चॅटिंग त्या ॲप मधील सुचने नुसार त्यांना देत जातात आणि फसतात. जेव्हा आपण आपण फसलोय हे तरुणांच्या लक्षात येतो तोपर्यंत तुमच्या अनेक नाजूक गोष्टी त्यांच्या हाती गेलेल्या असतात आणि त्याच्या माध्यमातून ते तरुणांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा धंदा सुरू होतो. भीतीपोटी काही तरुण पैसे देत राहतात. ना कोणाला काही सांगता येते ना बोलता येते अशी परिस्थिती तरुणांची होत असते.

काही तरुणांनी धाडस करून पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रारी केल्या आहेत मात्र अजूनही असे ॲप  फेसबुक वर आपल्याला नकळत दिसत असतात आणि त्यात अनेक तरुण फसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर वावरताना अत्यंत काळजीपूर्वक वावरणे गरजेचे आहे अन्यथा अशा फसवे ॲप डाऊनलोड करून आपला खिसा रिकामा होऊ शकतो तसेच समाज माध्यमात आपली प्रतिमा खराब होऊ शकते.

सावधान असे ॲप डाऊनलोड करू नका आणि आपले बँक खाते रिकामी करू नका. नकळत आपण फसला असाल तर थेट पोलिसांचे संपर्क करा

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular