Homeक्राईम'स्कूल के सामने चक्कर मारते हुए मेरे फोटो निकालकर मेरे बाप को...

‘स्कूल के सामने चक्कर मारते हुए मेरे फोटो निकालकर मेरे बाप को मोबाइल पर भेजता है क्या’ असे म्हणत विद्यार्थ्याने केले मुख्यध्यापकावर तलवारीने वार

advertisement

कन्नड दि ५ फेब्रुवारी-

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड शहरात कारखाना परिसरात जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालया मध्ये मजिद जमील शेख हा मागील अनेक दिवसांपासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकीवर फिरत मुलींची छेड काढत होता. मुख्याध्यापक ए. पी. चव्हाण यांनी त्याला अनेकदा समजावून सांगितले. मात्र त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही.

अखेर चव्हाण यांनी त्याला शाळेच्या परिसरात येण्यास मज्जाव केला होता याचा राग मानत धरून माजिदने शुक्रवारी शाळा सुटण्याच्या सुमारास गेटसमोर येऊन . मुख्याध्यापकांना दमदाटी करुन ‘स्कूल के सामने चक्कर मारते हुए मेरे फोटो निकालकर मेरे बाप को मोबाइल पर भेजता है क्या…’ असे म्हणत मुख्याध्यापक व अधीक्षक संतोष जाधव यांच्याशी त्यानं वाद करत शिवीगाळ केली. तसेच तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकीही दिली.

हा प्रकार घडल्यानंतर मुख्याध्यापक चव्हाण व अधीक्षक जाधव हे मजिदच्या वडिलांना सांगण्यासाठी मकरणपूर येथे जात होते. त्याच वेळी मजिदने त्यांना रस्त्यातच गाठले व तलवारीने अधीक्षक संतोष यांच्या डाव्या खांद्यावर वार, तर चव्हाण यांच्या उजव्या खांद्यावर व कानावर सपासप वार केले. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले.

हा प्रकार केल्या नंतर माजिद हा फरार झाला असून पोलीस त्याचा तपास करत आहेत मात्र या घटनेमुळे औरंगाबाद जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular