Homeजिल्हास्थानिक गुन्हे शाखा जोमात नगर तालुका कोमात नगर तालुक्यातील अवैध धंदयावर स्थानिक...

स्थानिक गुन्हे शाखा जोमात नगर तालुका कोमात नगर तालुक्यातील अवैध धंदयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे छापे एक लाखाच्या वर गावठी दारूचा मुद्देमाल जप्त

advertisement

अहमदनगर -१९ मार्च

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील नेप्ती येथे छापे टाकून सुमारे एक लाख रुपयांच्या वर किंमत असणाऱ्या गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन,गावठी दारू जप्त केली आहे.

कानिफनाथ भिमोजी कळमकर,राजू छबु पवार,राजेश बाजीराव पवार, या तीन आरोपींच्या घरच्या परिसरातून १,०४,५०० रुपये किंमतीचा गावठीरसायन हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व गावठी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली आहे.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर , पोहेकॉ बबन मखरे , पोहेकॉ देवेंद्र शेलार , पोलीस नाईक शंकर चौधरी पोलीस नाईक सचिन आडबल , पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे , पोलीस कॉन्स्टेबल मयुर गायकवाड ,पोहेकॉ संभाजी कोतकर यांनी ही कारवाई केली आहे.

नगर तालुक्‍याच्या हद्दीत हजारो लिटर गावठी दारू बनत असताना नगर तालुका पोलीस स्टेशन कारवाई का करत नाही हा प्रश्न समोर येत आहे. थेट स्थानिक गुन्हे शाखेने नगर तालुक्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे मात्र नगर तालुका पोलीस खरंच अंधारात होते का? असा सवाल उपस्थित होतोय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular