अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर बीड परळी हा रेल्वे मार्ग म्हणजे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र(maharshtra) यांना जोडणारा महत्वाचा रेल्वे मार्ग आहे.सुरुवातीला नारायणडोह पर्यंत चाचणी घेण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये बीड जिल्ह्यात आष्टीसुथो तालुक्यात सोलापूरवाडीपर्यंत रेल्वे धावली.१९९५ साली प्रथम या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली हा रेल्वे मार्ग एकूण २६१ किलोमीटरचा असणार आहे.स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न असलेला हा रेल्वे मार्ग आता आकार घेत असून आत्ता पर्यंत नगर ते बीड हद्दीत २३.५ किलोमीटर रेल्वे प्रत्यक्ष धावली आहे.सर्वात प्रथम २०१८ ला बारा किलोमीटर पर्यंत रेल्वे इंजिन (relway)धावले होते.आता या रेल्वे रुळाचे काम बीड(beed) जिल्ह्यातील आष्टी पर्यंत एकूण साठ किलोमीटरचे काम झाले असून. काही दिवसात या मार्गावर रेल्वे इंजिन धावून चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात सह बीड जिल्ह्यातीलसुथो लोकांना या रेल्वेची अनेक वर्षांपासून ची प्रतीक्षा आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे(gopinath munde) यांच्या नंतर माजी मंत्री पंकजाताई मुंडे(panlaja munde) यांनी सुद्धा या रेल्वे मार्गा बाबत पाठपुरावा करून केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळवून दिला होता. आष्टी पर्यंत ही रेल्वे धावल्यानंतर पुढचा टप्पा आष्टी ते बीड आणि बीड ते परळी असा राहील काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे