अहमदनगर दि. २५ मार्च
गेली दोन वर्षांपासून सर्व जग कोरोना या संसर्गजन्य आजाराशी झुंज देत आहोत कोरोनाशी लढा देत असताना आपण अनेक समस्यांना सामोरे गेलो अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला मात्र कोरोना आपल्याला खूप काही शिकवून गेला तर खूप काही हिरावून देखील या संकटाचा सर्वांनी मोठ्या धैर्याने सामना केला करण आपल्या भारतीय संस्कृतीत अध्यात्मिक आणि धार्मिकतेला मोठे अनन्यसाधारण असे महत्त्व देतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
श्रद्धा सबुरी विश्वास भक्ती-शक्ती आधीच्या जोरावर आपण सगळेजण कोरोनाशी झुंजलो मात्र आता कोरोना या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आटोक्यात आल्याने अनेक सण उत्सव धार्मिक आध्यात्मिक सामाजिक आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे धार्मिक आणि अध्यात्मिक तेतून आजच्या युवा पिढीला अध्यात्मिक तेची गोडी निर्माण व्हावी याच उद्देशातून आणि धार्मिक व अध्यात्मिक वातावरण शहरात निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून तब्बल चाळीस दिवस मोठ्या भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात हनुमान चालीसा भजन पाठ संध्येचे आयोजन अहमदनगर शहरात ठिकाणी केले जाते.
अहमदनगर शहरातील भोसले आखाडा या परिसरात शिवराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य हनुमान चालीसा पाठ चे आयोजन करण्यात आले होते .हनुमान चालीसा पाठ धार्मिक कार्यक्रमात परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी होत मंत्रमुग्ध आणि तल्लीन झाल्याचे पहावयास मिळाले.
या सगळ्यांचा एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमातून आपल्याला प्रत्येक आजाराशी सुखदुःखाशी लढण्यासाठी एक ऊर्जा निर्माण व्हावी यासंदर्भात दक्षिण मुखी हनुमान सत्संग मंडळ सर्जेपुरा भजनी मंडळाचे लक्ष्मीकांत हेडा व अशोक सचदेव आणि त्यांच्या सर्वच साथीदारांनी सादर केलेल्या हनुमान चालीसा गीतांवर सर्वच मंत्रमुग्ध झाले होते
शिवराज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय दिवटे धर्मकांत दिवटे सुदर्शन दिवटे अश्विन दिवटे पप्पू सुपेकर गणेश शिंदे नाना गाडवे भैय्या तांबे बबलू माने राजू पुरूषोत्तम विशाल गोसावी आदेश तांबे सनी चोरडिया अमोल वामन प्रदीप फुलसौंदर आदींनी या हनुमान चालीसा चे आयोजन केले होते.