कानपूर (प्रशांत द्विवेदी).
‘माझ्यासह तसेच शेकडो विद्यार्थी रोमानिया कडे जात असताना त्याच वेळेस रशियन आर्मी पुढे जात होती अगदी आमच्या शेजारून आर्मीची फौज गेली त्यांना पाहून आम्ही घाबरलो.पण आमच्या हातात भारताचा तिरंगा झेंडा दिसला आणि ते सैनिक तिरंग्याला सैल्यूट ठोकत पुढे गेले.
युक्रेनमध्ये अडकलेल्या श्यामनगर मधील प्रशांत सिंह याने ही घटना आपल्या वडिलांना सांगितली तेव्हा त्यांची मान अभिमानाने ताठ झाली होती.
त्याच बरोबर त्यांना पूर्ण खात्री आहे तिरंग्याच्या आश्रयाखाली त्यांचा मुलगा सुखरूप परत येईल प्रशांतचे वडील सिंग हे पीएसी मध्ये कमाला आहेत.
प्रशांतने त्यांना सांगितले की विद्यापीठ प्रशासनाणे सर्व विद्यार्थ्यांना बस मध्ये बसवून रोमानिया देशाच्या सीमेजवळ काही अंतरावर सोडले आहे आणि आम्ही सर्व सुखरूप आहोत.
“मेरी शान तिरंगा है मेरी जान तिरंगा है” या वाक्याचा प्रत्यक्ष अनुभव युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सध्या येत आहे.